मुस्लिम आक्रमकांनी हिंदूच्या अस्मितेचा र्हास केला – प्रकाश महाजन

मुस्लिम आक्रमकांनी हिंदूच्या
अस्मितेचा र्हास केला – प्रकाश महाजन
श्री महालक्ष्मी मंदिराचा लढा लढत राहू – अशोक तावरे
बीड )ःः परकीय मुस्लिम आक्रमकांनी जाणीवपूर्वक हिंदूच्या अस्मिता असणारे मंदिरे, स्मारके आणि वास्तु नष्ट करुन हिंदूच्या अस्मितेचा र्हास केला आहे, असे प्रतिपादन मनसेचे पक्ष प्रवक्ते श्री. प्रकाश महाजन यांनी केले आहे.
मनसेने बीड शहरातील पुरातन श्री महालक्ष्मी मंदिराबाबत सिध्दीविनायक संकुलाच्या प्रांगणात एका सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलतांना महाजन म्हणाले की, बीड जिल्हयाला ऐतिहासिक वारसा आहे. शहरातील अनेक पुरातन वास्तुंची परकीय आक्रमकांनी तोडफोड केल्याचे दिसून येते. हे परकीय आक्रमक मुस्लिम असल्याने त्यांनी जाणीवपूर्वक हिंदूच्या अस्मितेला तडा पोहचविण्याचे काम केले आहे. या पेक्षाही आश्चर्याची बाब म्हणजे छत्रपतींच्या महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जावू नये म्हणून नगरपालीकेत ठराव घेतला जातो हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, आणि त्याहूनही मोठे दुर्दैव म्हणजे ते ठराव घेणारे नगरसेवक हे मुस्लिम समाजाचे आहेत. त्यामुळे हिंदूच्या अस्मिता परंपरागत पायदळी तुडवण्याचे काम यांच्याकडून होत आहे.
यावेळी उपस्थितांना संबोधून अशोक तावरे म्हणाले की, बीड शहरातील श्री महालक्ष्मी मंदिराचा लढा आम्ही कायद्याने उभा केला आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून या प्रकरणी न्याय देण्याची मागणी आम्ही केली आहे. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा लोकशाही मार्गाने सुरुच राहील. तसेच बीड शहरातील पुरातन अशा वेशीवरील झेंडे त्वरीत हटवण्यात यावेत अशी मागणीही अशोक तावरे यांनी केली. या सभेत उपजिल्हाध्यक्ष सदाशिव बिडवे, शहराध्यक्ष करण लोंढे, ह.भ.प.रामेश्वर महाराज जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या सभेस बीड शहरातील महिला व पुरुष असे जवळपास नऊशे ते हजार लोक उपस्थित होते. या सभेस मनसेचे जिल्हा संघटक प्रमोद मोटे, जिल्हाध्यक्ष (सहकार) सुनील जगताप, महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई आंबुरे, सुनंदाताई हांगे, रेखाताई डाके, संभाजीनगरचे महानगर प्रमुख बिपीन नाईक, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश काळे, श्रीकृष्ण गायके, अनिल जमदाडे, रामेश्वर साळुंके, बन्सी गुंदेकर, आकाश टाकळकर, सुनील टाकळकर, तुषार दोडके, कार्तिक जव्हेरी, देवा गुंजाळ, भगवाधारी ग्रुपचे कृष्णा जाधव, आदर्श तरकसे, उमेश गायकवाड, ओम पालवे, सुरज वाघमारे, कृष्णा वाणी, ऋषीकेश सोळुंके, विजय शिंदे, समाधान साबळे यांच्यासह शहरातील हिंदू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.