ताज्या बातम्यादेश-विदेशबीडमहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

बीड सापडलेली वास्तू मंदिर आहे की, मशिद ?


बीड : बीड मधील वास्तू सध्या चर्चेचा विषय ठरतेय.
काहीजण इथे पूर्वी मंदिर असल्याचा दावा करतायत, तर काही जण ही मशिद असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहे. तर सापडलेली वास्तू मंदिर आहे की, मशिद या अनुषंगाने बीडमध्ये मनसेच्या वतीने एका सभेचं आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी सभेला मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

तर आपल्या भाषणातून महाजन यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत, आजही मोठ्या आवाजात वाजणार्‍या भोंग्यावर कारवाई होत नसल्याचं म्हटले आहे.
दरम्यान यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत कायदा होऊन देखील काद्यायाचे पालन केले जात नाही. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी मोठ्या आवाजात भोंग्यावरून आवाज अयाकाला मिळत आहे. मात्र यावर कुठलेही कारवाई होत नाही. मात्र उलट आम्हालाच देशांमध्ये भाषण करण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी अजाणच्या संदर्भात देखील योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रकाश महाजन यांनी केली.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाच विरोध का होतो?
अकोला येथील बार्शीटाकळी या ठिकाणी उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काही नगरसेवकांनी विरोध केल्यानंतर यावरून मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी सर्वच राजकीय पक्षांवर सडकून टीका केली आहे. तर स्वत:ला हिंदू म्हणून घेणारे जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारे या संदर्भात काहीच बोलत नाही. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध होत असताना कुठलाच राजकीय पक्ष का बोलत नाही? असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला आहे.


पुरातन वास्तूवरून वेगवेगळे दावे…
बीडमधली एक पुरातन वास्तू पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचा दावा केला जात असताना याच ठिकाणी मस्जिद असल्याचा देखील होत आहे. दरम्यान याच वादात मनसेने देखील उडी घेतली आहे. या ठिकाणी मंदिरच असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत मनसेकडून आज जाहीर सभा देखील घेण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात याच मुद्यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. तर प्रशासनाकडून देखील या सर्व वादावर विशेष लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे प्रकरण सुविस्तर .. !

कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली बुजून जात असलेले श्री महालक्ष्मी मंदिर
बीड चंपावतीनगरी अशी ओळख असलेल्या बीड शहरात किल्ला गेट परिसरात असलेले पुरातन हेमाडपंथी श्री महालक्ष्मी मंदिर कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली बुजवण्याचा प्रयत्न होत आहे. या ऐतिहासिक मंदिरामध्ये कचर्‍यासह ड्रेनेजचे पाणी सोडून मंदिराची जाणीवपूर्वक विटंबना करण्यात येत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. हे मंदिर विटंबनेपासून आणि अतिक्रमणापासून तात्काळ मुक्त करावे. येत्या १५ दिवसांत प्रशासनाकडून या प्रकरणी कारवाई न झाल्यास मनसे हे मंदिर अतिक्रमण मुक्त करेल, अशी चेतावणी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली होती
(प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासन स्वत: हून कृती का करत नाही ? मंदिर हिंदूंचे असल्याने ही अनास्था आहे का ? – संपादक)

१. अशोक तावरे यांनी या वेळी सांगितले की, आम्ही मंदिराविषयी जाणकार वयोवृद्ध नागरिकांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे मंदिर कंकालेश्‍वर मंदिराच्या समकालीन श्री महालक्ष्मीदेवीचे मंदिर आहे; मात्र मंदिराच्या परिसरात मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात असल्याने मंदिराकडे दुर्लक्ष झाले आहे. ही वास्तू अठराव्या शतकातील असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

२. या प्रकरणी मनसेने जिल्हा प्रशासनाकडे ऐतिहासिक वास्तूची दुरवस्था थांबवावी, असे निवेदनही दिले आहे. निवेदनानंतर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.

३. वास्तूला भेट दिल्यानंतर नीता अंधारे यांनी सांगितले की, प्रशासनाच्या वतीने लवकरच पुरातत्व विभागास पत्र दिले जाईल. त्यानंतर पुरातत्व विभाग सर्वेक्षण करून ही वास्तू नेमकी कोणत्या काळातील आहे, हे स्पष्ट करेल.

श्री महालक्ष्मी मंदिराचे जतन होऊन मंदिरात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा !

पुरातत्व विभागाचे बीड नगरपालिकेला पत्र

मनसेच्या चेतावणीनंतर महाराष्ट्र शासनाच्या साहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी २१ एप्रिल या दिवशी बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना पत्र पाठवून महालक्ष्मी मंदिराचे जतन करून स्वच्छता आणि दुरुस्ती करण्याच्या संदर्भात कळवले आहे. पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक अमोल गोटे यांनी नगरपालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बीड शहरातील किल्ला गेट परिसरात मिलिया महाविद्यालयाच्या मागे कागदी वेस येथे ‘महालक्ष्मी मंदिर’ या स्थानिक नावाने परिचित असलेली हेमाडपंथी वास्तू आहे. या मंदिराच्या ठिकाणी घाण आणि कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे मंदिराची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आमच्या पहारेकर्‍यांनी पहाणी केली असता ते निदर्शनास आले आहे. सद्य:स्थितीत हे मंदिर असंरक्षित आहे. असंरक्षित पुरातन स्मारकाच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचे नियमन, परिपत्रक १९८२ अन्वये या स्मारकाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. या स्मारकाची कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्मारकाच्या जवळपास स्वच्छतागृह किंवा मुतारी असे बांधकाम असल्यास ते काढून टाकण्यात यावे. स्मारकास लागून खासगी भूमी असल्यास स्मारकाच्या बाजूने संरक्षित क्षेत्र सोडण्यात यावे. स्मारकात पोचण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या प्राचीन मंदिराच्या दुरवस्थेला उत्तरदायी असणार्‍या प्रशासनातील संबंधितांना कारागृहात डांबा !
मुसलमानांच्या भावना जपण्यासाठी त्यांच्या परिसरातील मंदिरांकडे दुर्लक्ष करणार का ? या मंदिरामध्ये कचरा टाकून ते कोण भ्रष्ट करत आहे, हेही समोर येऊन त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक !

मनसेने तक्रार केल्यानंतर जागे झालेला पुरातत्व विभाग ! ही पुरान वास्तू जतन होण्याच्या दृष्टीने पुरातत्व विभागाने कोणतेच प्रयत्न का केले नाहीत ?
श्री महालक्ष्मी मंदिराची स्वच्छता, जतन आणि संवर्धन होईपर्यंत पुरातत्व विभागाने पाठपुरावा घेणे आवश्यक !


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button