भारतीय बौद्ध महासभा आयोजित भव्य धम्म रॅलीस सर्वांनी उपस्थित रहावे -ॲड. संजय रोडे
भारतीय बौद्ध महासभा आयोजित भव्य धम्म रॅलीस सर्वांनी उपस्थित रहावे -ॲड. संजय रोडे
———————
परळी : बुद्ध जयंती अर्थात बुद्ध पौर्णिमा संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात संपन्न केली जाते. भारतातही बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. येत्या दि. 5 मे रोजी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने परळी शहरात भव्य धम्म रॅलीचे आयोजन केले असून वंचित बहुजन घटकातील सर्व जाती समूहांनी या बौद्ध धम्म रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा सचिव ॲड. संजय रोडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, बुद्धाचा भारत घडविण्यासाठी व देशात स्वातंत्र्य, समता, व बंधुत्वाची भावना रुजवण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल कटिबद्ध असून परळी शहरात ऊधा दि.5 मे रोजी सायंकाळी 6 वा.राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथून भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.सदर रॅली टॉवर चौक ते कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा मार्केट, एकमिनार चौक येथून राष्ट्रनिर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वे स्टेशन या ठिकाणी या रॅलीचे विसर्जन होईल.
तरी परळी शहर व ग्रामीण भागातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा, तालुका, शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांनी तसेच वऺचित बहुजन घटकातील सर्व जाती, समुहाने या धम्म रॅलीला पाऺढरे शुभ्र वस्त्र परिधान करून व हाती पऺचरऺगी ध्वज तसेच मेनबत्ती घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन वऺचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा सचिव ॲड.संजय रोडे यांनी केले आहे.
अश्याच माहितीसाठी आणि बातम्यासाठी येथे🪀 क्लिक करून whatsapp ग्रुपला नक्की जॉइन व्हा.