गुन्ह्यांच्या तपासासाठी सक्षम अधिकारी द्या,रिपाइंची आंदोलनाच्या द्वारे ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे मागणी
जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ११९/ २०२३ या गुन्ह्यांच्या तपासासाठी सक्षम अधिकारी द्या !
रिपाइंची आंदोलनाच्या द्वारे ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडे मागणी
आरोपींना तात्काळ अटक करण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. मितेश घट्टे यांचे आदेश
पुणे : पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे युवानेते , गौतम भालेराव यांच्यासह इतरांवर प्राणघातक हल्ला करणार्या मुख्य फरार आरोपींना अटक करण्यात तपासीय पोलीस अधिकारी यांना यश आले नाही, त्यामुळे , जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ११९/ २०२३ या गुन्ह्यांच्या तपासासाठी सक्षम अधिकारी द्या, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले संलग्न रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने, मा. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन करण्यात आली,
रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाला आले यश, सावकारकीच्य माध्यमातून मुळशी खुर्द ता मुळशी येथील शेतकरी किसन कांबळे यांची जमिन हाडप करण्यात आली होती, याबाबत पौड पोलीस स्टेशन येथे पाच महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती परंतु सदर तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता , सदर विषय आंदोलनाच्या बॅनरवर पाहिल्यानंतर पौड पोलीस स्टेशनने संबंधित व्यक्तींवर सोमवारी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली, , याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाला यश आले.
शेख यांनी घोषणा दिल्या, यावेळी नंदू ओव्हाळ, संतोष ओव्हाळ, संतोष ननवरे ज्ञानोबा गायकवाड, बापू शिंदे, नंदकुमार ढावरे, प्रकाश कदम, नानासाहेब सोनवणे ( केदारी ) भिवा वळकुंदे, शेखर सोनवणे, विजय घोडेस्वार, सोनू वाघमारे, अरविंद कोकरे, शशिकांत चव्हाण, सुभाष सहजराव, किशोर पंडागळे, राहुल राऊत , नंदुमामा पवार, किसन कांबळे, कांचन कांबळे, बाळासाहेब कांबळे, फुलाबाई कांबळे, वनीता कांबळे रंजना बनसोडे, आशा भालेराव, अरहत कांबळे, आर्यन कांबळे, अशोक काळे, सचिन शिंदे, अमोल भोसले, प्रधान काळे, वेणीला पवार, ज्योती काळे, सुनंदा शिंदे, वैशाली शिंदे, ताराबाई भोसले, सुमन शिंदे, अनिता भोसले, सविता काळे आदी उपस्थित होते, डॉ. सतिश केदारी, विष्णूदादा भोसले , श्रीकांत कदम हरेशभाई देखणे, संतोषनाना डोळस, पंढरीनाथ जाधव, सुरज गायकवाड, बळीराम सोनवणे पुरुषोत्तम पवार यांनी , मा. अप्पर पोलीस अधीक्षक मा. मितेश घट्टे यांच्याशी चर्चा करून, त्यांना रिपाइंच्या वतीने निवेदन देण्यात आले