मला एकट्यालाचं भाजपा विरोधात लढाव लागेल : उध्दव ठाकरे
मुंबई : राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेले असताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जाउन भेट घेतली.
यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मला एकट्यालाचं भाजपासोबत लढाव लागेल.” अशी प्रतिक्रिया उध्दव ठाकरेंनी दिली.
उद्धव ठाकरे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत आणि या लढाईत काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. असे वेणुगोपाल माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, भाई जगताप हे देखील होते. वेणुगोपाल म्हणाले की, ‘मी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा निरोप घेऊन मी आलो आहे.”
“आमचा मेसेच हा स्पष्ट आहे, सध्याची राजकीय परिस्थिती, उद्धव ठाकरे कसा लढा देत आहेत, देशाची राजधानी कशाप्रकारे संपवली जात आहे याचे आपण साक्षीदार आहोत. दिवसेंदिवस ईडी, सीबीआय शिवसेना आणि विरोधी पक्षांना टार्गेट करत आहेत. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे. या लढ्यात आम्ही सगळे एकत्र आहोत. सध्या लोकशाही वाचवण्यासाठी सर्व एकत्र आलो आहोत. आम्ही एकसाथ आहोत. हा संदेश आम्हाला द्यायचा आहे.” असे वेणुगोपाल म्हणाले.
ठाकरे म्हणाले, “सध्या देशासमोरील अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहे. देशात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. या फोडाफोडीविरोधात विरोधकांचे समिकरण सुरू आहे. देशात विविध पक्ष आणि त्यांची विचारसरणी आहे. या पक्षांना एकत्रितपणे घेऊनसोबत जायचे आहे. त्याला लोकशाही म्हणतात. भाजप हाच एकमेव पक्ष राहील असे भाजपच्या अध्यक्षांनी म्हटले होते. ही भूमिका घातक आहे. शिवसेना या देशासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहे. आम्ही मैत्री निभावतो तेव्हा संबंध जोडतो. भाजपसोबत 25 वर्ष युती होती. पण त्यांना मित्र कोण, शत्रू कोण हे कळलं नाही. वेणुगोपाल यांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही जेव्हा मैत्री जपतो तेव्हा ती फक्त मैत्री राहत नाही तर एक नातं असतं. आपण देशाच्या लोकशाहीसाठी एकत्र लढू.” असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.