संविधानाचे आणि मानवी हक्कांचे खांडवीमध्ये उल्लंघन – आकाश
खांडवीत पाण्याच्या टाकीवर आंदोलन, सरपंच ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली त्याचा सरकार आणि आपण सर्वांनी अमृत महोत्सव देखील साजरा केला तरी देखील मूलभूत अधिकारांपासून खांडवी ग्रामपंचायत मधील नागरिक दूर आहेत अशी खांडवी मधील अपक्ष सदस्यांनी टीका केली.
संविधानाचे आणि मानवी हक्कांचे खांडवीमध्ये उल्लंघन – आकाश
या अगोदर देखील २६ जानेवारी २०२० रोजी पंचायत समिती, बार्शी येथे खांडवी येथील नागरिकांना पाण्यासाठी झगडावे लागले आहे. त्याचप्रमाणे आज तागायत खांडवी येथे कोणत्याही प्रकारचे नळाला स्वच्छ व पिण्याचे पाणी मिळत नसून ते वापरण्यायोग्य तर नाहीच पण सध्या गावात पाण्याची टंचाई गैरसोय होत आहे. खांडवी ग्रामपंचायत यांचे पाण्यासंदर्भात कोणतेही धोरण अवलंबलेले नाही त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी कोसो दूर जावे लागत आहे. या सर्व गोष्टींना खांडवी ग्रामपंचायत जबाबदार असून यात खांडवी येथील राहत असणाऱ्या नागरिकांचे संविधान अनुच्छेद 21 सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाऱ्याची आणि मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याचे खांडवीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश दळवी यांनी आंदोलन ठिकाणी सांगितले.
https://t.co/Hxm6cyKKR8
खांडवीत पाण्याच्या टाकीवर आंदोलन, सरपंच ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी— NAVGAN NEWS BEED (@beed_news) April 18, 2023
मुलभूत मागण्यासाठी धरणे आंदोलन
खांडवी मध्ये पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्यासाठी तात्काळ सोय करून गैरसोय दूर करावी, खांडवी मधील सर्व पाण्याची टाकींची स्वच्छता करावी, जाणीवपूर्वक अनुसूचित जाती-जमाती मधील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवल्याने ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागण्यासाठी खांडवी मधील उपळाई रोड येथील विद्यमान ग्रामपंचायत खांडवीचे (अपक्ष) पाच सदस्य आकाश पांडुरंग दळवी, सौ.सुवर्णा बालाजी वाघमारे, सौ.मीना विनोद गपाट , सचिन कुंडलिक चोरघडे, योगेश कल्याण सातपुते, मानवी हक्क आणि संरक्षण जनजागृती संघटनेचे महाराष्ट्र सचिव मनीष देशपांडे, सहजीवन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बालाजी डोईफोडे, सचिन मस्तुद, तंटामुक्त अध्यक्ष दादा दळवी, बंटी मोटे, सोनू वैद्य, लक्ष्मण वैद्य, राम चोरघडे, धनराज वाघमारे, रोहित बारंगुळे, विनोद गपाट, नितीन गपाट, तन्मय कोकाटे, अभिजित बारंगुळे, जोतिराम पाटील समस्थ खांडवी ग्रामस्थ यांनी पाण्याच्या टाकीवर चडून आंदोलन करण्यात आले.