इलेक्ट्रॉनिक कारच्या बोनेट मधून धूर,क्षणात कारने पेट घेतला पहा व्हिडिओ..
पुणे : कात्रज मोरेबाग समोरील सातारा रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक कारला आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी अचानक एका इलेक्ट्रॉनिक कारच्या बोनेट मधून धूर येऊ लागला.
प्रसंगावधान राखत चालक बाहेर पडले. काही क्षणात कारने पेट घेतला.या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कुणी जखमी झाले नाही.
सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. स्वारगेटकडून कात्रजच्या दिशेने येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कारने पेट घेतल्यानंतर घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी अग्निशमन दलास माहिती दिली.
कात्रजमध्ये इलेक्ट्रिक कारला आग! pic.twitter.com/P5miNouBqP
— Bhushan Tare (@bhushantare) April 16, 2023
कात्रज अग्निशमक दल केंद्र प्रमुख संजय रामटेके, चालक शेखर येरफूले, तांडेल अमोल कर्डेकर, सचिन शिंदे व फायरमन जयवंत तळेकर, संदीप घडशी, निलेश राजीवडे आग आटोक्यात आणली.
सातारा रस्त्यावर कारने पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते काही काळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभागाने कार बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !