फडणवीस आजपर्यंत कधी अयोध्येला गेले, हे तुम्हाला कधी आठवतं का?- उद्धव ठाकरे
नागपूर : महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर जोरदार टीका केली. आम्ही सरकारमध्ये असताना न्यायालयाने राममंदिरांचा निकाल दिला. आता हे अयोध्येला गेले. पण सुरुवातीला हे सुरतला गेला. हिंदुत्व असतं तर आधी अयोध्येला गेले असते. दरम्यान हे अयोध्येला गेले त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसही गेले. फडणवीस आजपर्यंत कधी अयोध्येला गेले, हे तुम्हाला कधी आठवतं का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच केवळ तुझा शर्ट माझ्यापेक्षा भगवा कसा, यासाठीच हेही अयोध्येला गेल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचं नाव न घेता लगावला.
उद्धव ठाकरे यांनी सत्यपाल मलिक यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून मोदींवर हल्लाबोल केला. मलिक यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर तुम्ही काही बोलणार की नाही. पुलवामा हल्ल्याबाबत ते बोलले. या हल्ल्यावरून मलिक यांना शंका आली होती की, हल्ल्याचं राजकीय भांडवल करण्यात येणार आहे. कारगील युद्धाच्या वेळी बिपीन मलिक यांनी भाजपच्या सभाच्या वेळी लावण्यात येणाऱ्या सैन्य प्रमुखांच्या फोटोंवर आक्षेप घेतला होता. हा विजय सैनिकांचा असल्याचं त्यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना सांगितलं होत. याचा खुलासा त्यांनी पुस्तकात केला होता. त्यामुळे तुमचे अंधभक्त तुमचे सैनिक होऊ शकतात. पण देशाचे सैनिक तुमचे सैनिक असू शकत नाही. देशावर हल्ला झाला, याची उत्तरे तुम्ही द्यायला हवी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !