मद्य घोटाळा,अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी, आप पक्ष आक्रमक
दिल्लि : मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी सुरू आहे. याच्याच निषेधार्थ राज्यभरात आप कार्यकर्त्यांकडून भाजपविरोधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं आहे.
मोदी सरकार दडपशाही करीत असल्याचा आरोप करत आपने अकोला येथील गांधी जवाहर बाग येथे निषेध नोंदवला. मोदी सरकारच्या दडपशाही करीत असल्याचा आरोप करत गांधी जवाहर बाग येथे आपच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला
पुण्यात आप कार्यकर्त्यांचं सत्याग्रह
पुण्यातही आप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमत केजरीवाल यांना सीबीआयने दिलेल्या नोटिशीविरोधात सत्याग्रह आंदोलन केलं. पुण्यात राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. यावेळी काळी फीत दंडाला बांधून मोदी सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यात आला.
दिल्ली दारू धोरण प्रकरणी सीबीआयने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली. काही दिवसांपूर्वी सीबीआयने सीएम केजरीवाल यांना चौकशीत सहभागी होण्याची नोटीस दिली होती.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !