बस ५०० फूट खोल दरीत कोसळली,१३ प्रवाशांचा मृत्यू,२५ जखमी
पुणे-मुंबई महामार्गाव खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. खासगी बस थेट दरीत कोसळली आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात सुरुवातीला ७ ते ८ लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते
साधारण अंदाजे ४० ते ४८ प्रवाशांची ही बस होती. मिळालेल्या माहितीनुसार यात सुमारे १३ लोकांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींवर खोपोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
एक खासगी बस ५०० फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात अत्यंत भीषण असून त्यात अंदाजे २५ लोक जखमी झाले.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. बस दरीत कोसळल्याच्या आवाजाने आणि बसलेल्या झटक्याने काही भानावर आले अन् पहाटेच्या अंधारात किंकाळ्या घूमू लागल्या.
आता इथे रेक्यू ऑपरेशन सुरू आहे. लोणावळ्याजवळ बोरघाट परिसरातील शिंगरोबा मंदिराजवळ ही दुर्घटना घडली.
पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला.
जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, आणखी प्रवासी बसमध्ये अडकल्याची माहिती मिळत आहेत.
बचावपथकांकडून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
घटनास्थळी दाखल होऊन स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केलं. अपघातातील जखमींना बाहेर काढलं जात आहे. रात्रीचा अंधार असल्याने या बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र, उजाडताच या मदतकार्याच्या कामास वेग आला
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !