भोर शहरात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी;प्रबोधनात्मक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

भोर शहरात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात साजरी;प्रबोधनात्मक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले व जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.
भोर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी भोर शहरातील एस टी स्टँड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
दोन वर्षांनंतर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. यानिमित्ताने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करम्ण्यात आले होते. प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.भोरशहर व तालुक्यातील सामाजिक संघटना व स्थानिक मंडळांतर्फे आणि राजकीय पक्षांतर्फे महामानवाला अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करम्ण्यात आले होते.यावेळी सौ सिमा ताई तनपुरे भोर तालुका उन्नती महिला प्रतिष्ठान अध्यक्ष ,बारा बलुतेदार महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष -निलेश भाऊ कुंभार ,संत सावतामाळी महासंघ प्रदेश सहकार्याध्यक्ष श्री अशोक दादा वचकल ,भीम आर्मी संघटना अध्यक्ष महेश शेठ साळुंके ,भारतीय श्रमिक संघटना अध्यक्ष श्री सचिन भाऊ जाधव ,फुले शाहू आंबेडकर विचार मंच पदाधिकारी ,श्रीरंग नेवसे महेश म्हेत्रे अशोक शिंदे ,रविंद्र भालेराव सर ,रोहिदास जाधव सर ,डॉ आगटे ,माळी सर ,पवळे सर ,अशोक शेठ मोरे -प्रहार अपंग क्रांती संघटना भोर ,मोरे परिवार व रणखांबे परिवार ,गायकवाड परिवार विविध सामाजिक संघटना व असंख्य सामाजिक कार्यकर्ते नागरिक व समाज बंधू उपस्थित होते
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !