Video : राहुल गांधींचं सामान न्यायला ट्रक आला, गाडीत काय भरलंय?
नवी दिल्लीः काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना शासकीय निवासस्थान सोडण्यास सांगण्यात आलेलं होतं. आज राहुल गांधी यांच्या घरातील सामान नेण्यासाठी ट्रक आला.
यावरुन राहुल गांधी घर रिकामं करताय, हे निश्चित झालेलं आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
‘मोदी’ आडनावावरुन केलेल्या टिपण्णीनंतर राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावणी. या निर्णयावरुन लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द केलं.
#WATCH | Trucks at the premises of Delhi residence of Congress leader Rahul Gandhi. He is vacating his residence after being disqualified as Lok Sabha MP. pic.twitter.com/BZBpesy339
— ANI (@ANI) April 14, 2023
त्यानंतर देशाच्या राजकारणात गदारोळ झाला. विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. काँग्रेसकडून या प्रकरणी कोर्टात दाद मागण्यात आलेली आहे. मात्र त्यापूर्वी राहुल गांधी यांना शासकीय निवासस्थान खाली करण्यास सांगण्यात आलेले होते.
लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने २२ एप्रिलपर्यंत राहुल गांधींना सरकारी बंगला रिकामा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता राहुल यांचं सामान ट्रकमधून नेण्यात येत आहे.
‘एएनआय’ने यासंदर्भातील एक ट्विट केलेलं असून एका ट्रकमध्ये राहुल यांचं सामान भरलेलं दिसत आहे. राहुल गांधी यांच्यावर केलेली कारवाई हेतूपुरस्सर असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !