मंत्रालयात दिवसभर एकच चर्चा सरकार जाणार?
खासगी चॅनेलच्या कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निघून जाणे, मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राच्या उद्घाटनाचा पुढे ढकललेला कार्यक्रम, आर्थिक विषय लगोलग हातावेगळे करण्याचा सपाटा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षाचा कधीही जाहीर होणारा निकाल अशा घटनांमुळे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
त्यामुळे आता आमचे आठच दिवस राहिले आहेत, असे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आज जाहीररीत्या बोलत होते.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या याचिकेवर गेल्या आठ महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायाधीशांच्या बेंचसमोर सुनावणी झाली. त्यातील एक न्यायाधीश 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. तत्पूर्वी निकाल येईल, असे अपेक्षित आहे. त्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता वाढली आहे. शिंदे गटाचे मंत्री बॅकफूटवर गेलेले दिसतात. इतकेच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात कोर्टाच्या संभाव्य निकालाच्या चर्चा सुरू आहेत.
आम्ही आवराआवर सुरू केली!
आम्ही आता आवराआवर सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयातील एक अधिकारी दबक्या आवाजात पत्रकारांना सांगत होता. सध्या आम्ही निर्णय वेगाने मार्गी लावत आहोत, खास करून आर्थिक विषयाच्या निर्णयांना प्राधान्य आहे, असे सीएमओतील दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले.
गृह विभागात गोपनीय बैठका
एकनाथ शिंदे यांचे काय होईल, अशी चर्चा मंत्रालयातल्या सर्व मजल्यांवर होती. अनेक वरिष्ठ अधिकारी पत्रकारांनाच फोन करून सरकार जाणार का, अशी विचारणा करीत होते. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांच्या आज सतत गोपनीय बैठका सुरू होत्या. एटीएस प्रमुख सदानंद दाते यांनीही आनंद लियमे यांची भेट घेतली.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !