विजांच्या कडकडाटासह पुण्यात पावसाची हजेरी! औंध-पाषाण परिसरात मुसळधार..
पुणे : पुण्यात पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात गेले दोन दिवस उन्हाचा तापमान चाळिशीपार गेले होते. मात्र महाराष्ट्र, दक्षिण कोकणात वादळी पावसासह गारपीट (Hailstorm) , तर उर्वरित राज्यातही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता.
त्यानुसार पुण्यात अनेक भागात पावसाला सुरूवात झाली आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात पावसाची धुव्वाधार बॅटींग सुरू आहे. विजांचा कडकडाट देखील सुरू आहे.
Pune Rain : विजांच्या कडकडाटासह पुण्यात पावसाची धुव्वाधार बॅटिंग #punerain #punerainupdate pic.twitter.com/o8mkBRCgcd
— SakalMedia (@SakalMediaNews) April 13, 2023
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
खडकवासला परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. खडकीत वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. औंध, बोपोडी,सकाळनगर, पाषाण, सूसरस्ता येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसंच, राज्यातील अनेक जिल्ह्यांना १ ३ ते १४ एप्रिल रोजी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !