भयंकर आकडेवारी! कोरोनाचा वेग वाढला! 24 तासात 10 हजारांहून अधिक रुग्ण..
कोरोना विषाणूचा वेग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांमधील आकडेवारी भीतीदायक असून यामुळे केंद्रासह राज्य सरकारही अलर्ट झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध राज्य सरकारांनी कडक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
अनेक राज्यांमध्ये मास्कसक्तीचाही निर्णय घेण्यात आला आहे.
देशभरात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना संसर्गाचे 10 हजार 158 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडाही 45 हजारांच्या पार पोहोचला आहे. तसेच कोरोनाचा पॉझिटिव्ही रेटही 4.42 टक्क्यांवर गेला आहे. याआधी बुधवारी 7 हजार 830 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.
Covid-19 | India reports 10,158 new cases in last 24 hours; the active caseload stands at 44,998
(Representative Image) pic.twitter.com/yS0pdGdjbf
— ANI (@ANI) April 13, 2023
पुढील 10-12 दिवस महत्त्वाचे
दरम्यान, पुढील 10-12 दिवस महत्त्वाचे असून या काळात कोरोना संक्रमणाचा वेग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रुग्णांचा आकडा वाढणार असला तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी असेल असेही तज्ज्ञांनी सांगितले. तसेच कोरोनाच्या XBB.1.16 या नवीन व्हेरिएंटमुळे रुग्णांचा आकडा वाढत असून हा ओमिक्रॉनचा एक सब-व्हेरिएंट आहे. ताप, सर्दी, खोकला, नाक वाहणे, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी आणि जुलाब अशी याची प्राथमिक लक्षणे आहेत.
मे महिना धोक्याचा
मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशातच रुग्णवाढ होत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी निर्णायक बैठक घेऊन चाचण्या वाढवण्याचे निर्देश राज्यांसह स्थानिक प्रशासनांना मागील आठवडय़ात दिले. पालिकेने यानंतर दररोज दहा हजार चाचण्या करण्याची क्षमता असल्याचेही सांगितले, मात्र अद्याप दोन हजारांहून कमी चाचण्या होत आहेत. मुंबईत चाचण्या वाढवल्यास खरा प्रकोप समोर येईल, असे आरोग्यतज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !