भाजपच्या गोटातून मोठी बातमी, चंद्रकांतदादांवर मोठा नेता नाराज!
नवी दिल्ली:चंद्रकांत पाटील यांच्या बाळासाहेब ठाकरेंविरोधातल्या वक्तव्याने राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. चंद्रकांत पाटलांच्या या विधानानं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील नाराज झाल्याची माहिती आहे, त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंविरोधी विधान करणं, चंद्रकांत पाटलांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
बाबरी मशीद पाडण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा सहभाग नव्हता, असं विधान करत, चंद्रकांत पाटलांनी वाद ओढवून घेतल्याचं पाहायला मिळतंय. मागील दोन दिवसांपासून ठाकरे गटासह विरोधकांनी चंद्रकांत पाटलांवर टीकेचे बाण चालवायला सुरुवात केली. पण, त्यातच आता चंद्रकांत पाटलांच्या या विधानाने अमित शाह देखील नाराज झाल्याची माहिती मिळतेय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी वक्तव्य नको, अशी वादग्रस्त वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात अमित शाहांनी भाजप नेत्यांना खडसावल्याचं कळतंय.
यानंतर आता भाजप नेत्यांनीही याप्रकरणात चंद्रकांत पाटलांनी एकाकी पाडल्याचं दिसून येतंय. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांच्या विधान भाजपशी जोडणं गैर असल्याचं म्हटलंय. किंबहूना बाळासाहेबांच्या नावांमुळेच लोकांचं प्रेम मिळाल्याचं सांगत, चंद्रकांत पाटलांना चिमटा काढलाय. अजितदादांच्या मनात चाललंय काय?
तेव्हा या आमदारांनी दिली होती साथ सत्ताधारी स्वत: चंद्रकांत पाटलांच्या विधानावरुन हात झटकत असतानाच, ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. ठाकरे गटाने चंद्रकांत पाटलांविरोधात आंदोलन करत, बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. एकंदरीतच, राज्यातील सत्ताधारी पक्ष विविध मार्गानं बाळासाहेब ठाकरेंचा गौरव करत असतानाच, चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेब ठाकरेंविरोधात विधान करुन वाद ओढवून घेतलाय. परिणामी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याविरोधात आता त्यांच्या पक्षातूनही नाराजी सूर उमटू लागलाय.
आता स्वत: अमित शाह देखील त्यांच्यावर नाराज झाले असतील, तर चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पुढे काय घडतं? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !