कपाटातून सोन्याच्या दागिण्या सह ६७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास..
अमळनेर : शहरातील भालेराव नगरात असलेल्या एका घराच्या कपाटातून सोन्याचे दानिगे असा एकुण ६७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरण अमळनेर पोलीस ठाण्यात दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कविता गणेश बोरसे रा. भालेराव नगर, धुळे रोड, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ एप्रिल रोजी त्यांच्या घरातील कपाटातून दिनेश भावसार आणि आदित्य दिनेश भावसार दोन्ही रा. अमळनेर यांनी सोन्याचे तुकडे, सोन्याची अंगठी असा एकुण ६७ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात दिनेश भावसार आणि आदित्य दिनेश भावसार दोन्ही रा. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !