धक्कादायक !कोरोनानं वाढवलं टेन्शन! मुलांना सर्वात जास्त धोका
नवी दिल्ली : पुन्हा एकदा देशात कोरोनाची दहशत पसरत आहे. कोरोना कमी झाला असं वाटत असतानाच आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या आठवड्याभरात 79 टक्क्यांनी वाढली आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या 24 तासांत देशात 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ३ जण दिल्लीतील आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये कोरोना संसर्गाचा दर 26 टक्क्यांच्या वाढत आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !
चाचणी केलेल्या प्रत्येक 100 लोकांपैकी 26 जण हे कोरोना पॉझिटिव्ह सापडत यूपीबद्दल बोलायचे झाले तर गौतम बुद्ध नगर जिल्ह्याची स्थिती सर्वात वाईट असल्याचे सांगितले जात आहे. तेथे कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले असून, त्यामुळे प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 5676 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनामुळे 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये केरळमधील 6 आणि दिल्लीतील 3 रुग्णांचा समावेश आहे. यासह, देशातील कोरोना साथीच्या सक्रिय रुग्णांची संख्या 37 हजारांच्या पुढे गेली आहे. दिल्लीला लागून असलेल्या गौतम बुद्ध नगरमध्येही कोरोना महामारीचा स्फोट झाला आहे. जिल्ह्यातील सूरजपूर शहरात गेल्या आठवडाभरात सुमारे 35 जण याच्या विळख्यात आले आहेत.
मंगळवारी कस्तुरबा गांधी निवासी वसतिगृहात झालेल्या यादृच्छिक चाचणीत 17 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. वसतिगृहातील 10 मुलांना खोकला आणि सर्दीचा त्रास होता, त्यासाठी शाळेने त्यांना जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता, 10 पैकी 8 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. महाराष्ट्रातील विजापूरमध्येही 18 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. या मुलांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून मुलांची काळजी घेण्याचे आणि त्यांच्यात लक्षणं आढळल्यास लगेच चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
लोकशाही न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे❤️ क्लिक करा !