ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रराजकीय

कोरोना वाढतोय पण सरकार गंभीर नाही – अजित पवार


महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणुचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून काही रुग्णांचा मृत्यूही होत आहे.

याबाबत मात्र राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नागरिकही कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. कुणीही मास्क वापरणे व इतर खबदारी घेताना दिसत नाही. ही चिंताजनक बाब असून याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र याला कुणी गांभीर्याने घेताना दिसत नाही. या गोष्टीचे गांभीर्य लोकांना पटवून देण्यासाठी सरकारने सर्व सरकारी कार्यालयात मास्क सक्ती करणे गरजेचे आहे. मात्र असे कोणतेही आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये कोरोना संक्रमणाचे गांभीर्य राहिलेले नाही. राज्य सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा घ्यावा. नागरिकांना त्याचे गांभीर्य सांगावे. यातून जनतेला वस्तूस्थिती समजेल.”
कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी सरकारने सर्वांना बरोबर घ्यावे, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केल. अजित पवार म्हणाले, “राज्य सरकारने कोरोना विषयाबाबत संपूर्ण सभागृहाला विश्वासात घ्यावे. संसर्ग रोखण्यासाठी काय योजना असेल ती सर्वांना समजावून सांगावी. त्यानुसार सर्वपक्षीय कार्यकर्ते कामाला लागतील. तसेच काही स्वयंसेवी संस्थाचीही मदत घेणे गरजेचे आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या काळात सर्वांशी समन्वय साधला गेला होता. त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या संपर्कात होते.”

कोरोनाबाबत राज्य सकरकार गंभीर नसल्याचा आरोपही पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, “राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचे सरकारला गांभीर्य नाही. त्यांनी सरकरी कार्यलयाला कोणतेही आदेश दिलेले नाहीत.त्यामुळे कुणीही मास्क वापरताना दिसत नाही. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूही होत आहेत. त्यामुळे सरकराने ही बाब गांभिर्याने घेऊन जनतेला दिलासा द्यावा.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button