चार दिवसांत आरोपींना अटक न केल्यास ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा..
चार दिवसांत आरोपींना अटक न केल्यास ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करु,
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनात रिपाइंचा इशारा
सासवड : रिपब्लिकन पक्षाचे युवानेते गौतम भालेराव यांच्यासह इतरांवर प्राणघातक हल्ला करणार्या उर्वरित आरोपींना चार दिवसांत अटक न केल्यास ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करु, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे नेते तथा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले यांनी दिला,
पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते गौतम भालेराव यांच्यासह इतर चारजणांवर भ्याड प्राणघातक हल्ला करणार्या उर्वरित आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी , रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार ,व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी यांच्या नेतृत्वाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांच्या कार्यालयासमोर बुधवार दिनांक ५ / ४ / २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना विष्णूदादा भोसले यांनी वरील इशारा दिला, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे नेते हरेशभाई, देखणे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पुणे शहराध्यक्ष सुरज गायकवाड , माजी जिल्हाध्यक्ष पंढरीनाथ जाधव, रिपब्लिकन पारधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पवार, रिपाइं नेते नामदेव नेटके ,बळीराम सोनवणे, रिपब्लिकन युवानेते दत्ता गायकवाड, , विशाल गायकवाड
डॉ. एन. डी. धिवार भोयटेसर रामकृष्ण वाघमारेसर कुंडलिकबापू सोनवणे भिवा वळकुंदे , अजय शिंदे, चर्मकार महासंघाचे पुरंदर तालुक्याचे माजी अध्यक्ष, गुलाबराव सोनवणे, अशोकराव गायकवाड विजय घोडेस्वार , दादा गायकवाड कुमार मोरे, सचिन शिंदे , निलेश शिंदे , प्रकाश कदम, स्वप्निल पाटोळे, संदीप बेंगळे, भगवान डिखळे, चंद्रकांत डिखळे, चक्रधारी सोनवणे, खंडूशेठ भालेराव, मुन्ना भोसले, अशोक काळे, विशाल गायकवाड, अमोल गायकवाड , सचिन कांबळे , आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या,
२४ मार्चला घटना घडल्या नंतर जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ११९ / २०२३ या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना आज तागायत अटक होत नाही, त्यामुळे याबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची शिष्टमंडळासह भेट घेऊ, असे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश केदारी यांनी बोलताना जाहीर केले.
पोलीस प्रशासनाच्या वतीने, सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले , व सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक नेमले असून, दोन ते तीन दिवसांत आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन दिले,
भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील हे जेजुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. ११९ / २०२३ या गुन्ह्यांचे तपासीय अधिकारी आहेत, यांना आंदोलनाची माहिती असूनही , ते कार्यालयात उपस्थित नव्हते, तसेच ज्या पोलीस स्टेशन हद्दीत हा गुन्हा घडला , त्या पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी देखील आंदोलन स्थळी भेट देण्याचे टाळले, हि बाब कर्तव्याला बगल देणारी आहे, त्यामुळे याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली,
सदर आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष विष्णूदादा भोसले , रिपाइं नेते हरेशभाई देखणे, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस यांनी, सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली, यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली,
सदर आंदोलनास जेजुरी आनंदनगर येथील अनेक महिला उपस्थित होत्या, पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे नेते व रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस, यांनी आंदोलनाबाबत निवेदन दिले होते,