बंजारा समाजाला राजसत्तेत भागीदारी मिळवण्यासाठी धर्मसत्तेचा पाया मजबूत करने गरजेचे आहे – किसनभाऊ राठोड
बंजारा समाजाला राजसत्तेत भागीदारी मिळवण्यासाठी धर्मसत्तेचा पाया मजबूत करने गरजेचे आहे – किसनभाऊ राठोड
————————————–
बीड : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होवून गेली तरीही बंजारा समाजाला संविधानिक न्याय हक्क, राजकीय भागीदारी व तांड्यावर मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत,त्यामुळे समाज विकासापासून कोसो दूर राहिला आहे.बंजारा समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी सत्तेच्या चाव्या ताब्यात घेणे गरजेचे आहे.याच उद्देशाने महाराष्ट्र,कर्नाटक आणि देशातील इतर राज्यात मोठ्या प्रमाणात आम्ही धार्मिक स्थळे,बंजारा तिर्थक्षेत्र निर्माण करीत आहोत,धर्मसत्तेची भक्कम पायाभरणी झाल्याशिवाय बंजारा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात हक्कासाची राजकीय भागीदारी मिळणार नाही,असे रोखठोक विचार राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक,बंजारा तिर्थक्षेत्र बाराधामचे निर्माते आदरनिय किसनभाऊ राठोड यांनी मांडले.संत सेवालाल महाराज यात्रेनिमित्त भक्तीधाम पोहरादेवी येथे आयोजित राजकीय परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,प्रत्येक धार्मिक स्थळांवर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक इ. समाज प्रबोधनाचे कार्यक्रम अविरत राबविले जातात.बंजारा समाजात सामाजिक राजकीय व धार्मिक एकता निर्माण व्हावी, शिक्षण व उद्योगाचे महत्त्व तथा पंच्याहत्तर वर्षांपासून विविध राजकीय पक्षांना आपण करत असलेल्या मतदानाची किंमत समाजाला कळावी याच उद्देशाने हे उपक्रम राबविले जातात.
रामनवमीच्या यात्रेनिमित्त पोहरादेवी येथील धर्मपीठावर राजसत्तेत आणि धर्मसत्तेत काम करणारे देशपातळीवरील दिग्गज नेते व धर्मगुरू एकत्रित आल्यामुळे बंजारा बहुल भागातील नेते व कार्यकर्त्यांना निश्चित पाठबळ मिळेल,२०२४ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाचे चित्र नक्कीच बदलेल असा आशावाद राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय समन्वयक, प्रसिद्ध उद्योगपती आदरनिय
किसनभाऊ राठोड यांनी व्यक्त केला.
पोहरादेवी,वाशिम- देशातील बंजारा समाजाचे दैवत राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या यात्रेनिमित्त वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची पवित्र काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उमरीगड भक्तीधाम गोर बंजारा धर्म परिषद पोहरादेवी येथे दि. २८,२९,३० मार्च रोजी तीन दिवस सामाजिक शैक्षणिक अर्थिक धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक व राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी गोरपीठावरून किसनभाऊ राठोड बंजारा बंजारा समाजाला संबोधित करीत होते.
गोरपीठावर गोर बंजारा धर्म पिठाधिश्वर प.पू बाबुसिंग महाराज,राजमाता प.पू रत्नायाडी,महंत दादाराव महाराज,महंत सुनील महाराज, महंत जितेंद्र महाराज,महंत खुशाल महाराज,महंत अभिमान महाराज,महंत सुंदरसिंग महाराज,तेलंगणा राज्याच्या मंत्री सत्यवती राठोड,आ.बापुराव राठोड,आ.रेखाताई राठोड, मा.आ.अनंतकुमार पाटील, यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या संभाव्य उमेदवार अलंक्रितताई किसनराव राठोड,राष्ट्रीय बंजारा परिषदेचे माजी महासचिव तथा बीडचे मा.जिल्हा परिषद सदस्य प्रा.पी.टी.चव्हाण,बाबुसिंग नाईक,राष्ट्रवादीचे नेते हिरालाल राठोड,युवा उद्योजक अँड.पंडितभाऊ राठोड,राष्ट्रीय संघटक विलास राठोड, मध्यप्रदेशचे नेते कमलेश राठोड, कर्नाटकचे नेते आर.बी.नाईक, मुख्य गोरधर्म रक्षक नवनाथ भाऊ चव्हाण,राष्ट्रीय बंजारा परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष श्रीमंतराजे चव्हाण,मधूकर जाठोत,राज्य संघटक पो.नि सुभाषभाऊ राठोड,डॉ.मोहन चव्हाण,प्राचार्य श्रीमंतभाऊ राठोड,अमोलभाऊ पवार, पत्रकार शंकरभाऊ आडे,इत्यांदी संत महंत व नेते मंडळी उपस्थित होती.
किसनभाऊ राठोड पुढे म्हणाले की देशातील जवळपास सव्वीस राज्यात बंजारा समाज वास्तव्यास असून गोर बंजारा समाजाची लोकसंख्या देशात पंधरा कोटी आणि महाराष्ट्रात दिड कोटींच्या आसपास आहे,मतदानाची टक्केवारी निर्णायक असताना देखील सर्वच राजकीय पक्ष बंजारा समाजाला राजकीय भागीदारी देण्याबाबत उदासीन आहेत.हा अन्याय अजून किती वर्षे सहन करायचा,म्हनून येणार्या काळात आपलाच दांडा आणि आपलाच झेंडा हाती घेऊन वेळप्रसंगी राजकीय आखाड्यात उतरावे लागेल,अशी रोखठोक भुमिका घेणे गरजेचे आहे.बंजारा समाजाने आपसातील गटतट मतभेद विसरून सेवालाल महाराजांच्या पांढ-या झेंड्याखाली एकत्रितपणे येवून राजकीय लढाई लढणे हि काळाची गरज आहे.यावेळी तेलंगणा कॅबिनेट मंत्री ना.सत्यवती राठोड,आ.रेखाताई राठोड,आ.बापुराव राठोड, मा.आ.आनंतकुमार पाटील, प्रा.पी.टी.चव्हाण यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल नाईक,प्रेमकिसन राठोड, शामभाऊ राठोड,राजूभाऊ राठोड,गोर प्रकाश राठोड, वसंतराव राठोड,नंदलाल महाराज आडे,मिथुन राठोड, नंदूभाऊ राठोड,संतोष जाधव, दिलीप राठोड,बाजीराव राठोड, सज्जनभाऊ राठोड,रावसाहेब चव्हाण,पवन जाधव,अमर राठोड,राजू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
अनेक साहित्यिकांनी आपल्या रचना सादर केल्या.यावेळी सामाजिक शैक्षणिक साहित्य राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांना समाज रत्न,सेवारत्न पूरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गोर धर्माच्या पांढर्या झेंड्याचे ध्वजारोहण व धर्म दंडाचे पुजन करण्यात आले.
तीन दिवस रात्रंदिवस भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे व प्रबोधनाचे कार्य सुरू होते.
लाखो भाविक भक्तांची कार्यक्रमाला उपस्थित होती.
राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी गोर बंजारा धर्मपीठ,भक्तीधाम शक्तीपीठ उमरीगडला भेट देऊन संत सेवालाल महाराज,जगदंबा देवी,संत हामुलाल महाराज, सामकी माता व संत रामराव महाराजांच्या मुर्तींचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले.