ताज्या बातम्यादेश-विदेशनांदेड

नांदेड शासकीय विश्रामगृह येथे कार्यरत 5692 ची सभा संपन्न


नांदेड शासकीय विश्रामगृह येथे कार्यरत 5692 ची सभा संपन्न

नांदेड : शासकीय विश्रामगृह नांदेड येथे महाराष्ट्र राज्य कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना रजी न 5692 ची राज्य सभा श्री.जावेद शेख यांच्या अध्यक्षतेखाली थाटात संपन्न झाली यावेळी राज्याचे उपाध्यक्ष गोपालभाऊ राठोड,राज्य सरचिटणीस भारतभाऊ डोंगरे,राज्य कोषाध्यक्ष विनोदभाऊ देशमुख, संघटक शरदभाऊ डहाके,राज्य सल्लागार उमेशभाऊ घोरपडे,राज्य सदस्य रामेश्वर झाटे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष विस्वनाथ टोपरे,पुणे जिल्हा संघटक गणेश काका वाघ,परभणी जिल्हा अध्यक्ष प्रमोद माकोडे बुलढाणा जिल्हा सचिव भारत शिंदे सह बहुसंख्य पदाधिकारी व कर्मचारी हजर होते
राज्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले संघटनेच्या वाटचाली बद्दल सखोल माहिती दिली सभे दरम्यान
1)मुख्य मागणी वेतन श्रेणी
तत्पूर्वी
2)कलम 61 मध्ये दुरुस्ती करणे
3)वेतनावरील कर वसुलीची अट कायम रद्द करणे
4)निवृत्ती नंतर सन्मानाने जीवन जगता यावे करिता पेन्शन लागू करणे
वरील मागण्यांसाठी
आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करण्या बाबत एकमताने ठराव पारित करण्यात आला
——————————–
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांमधून नांदेड जिल्हा कार्यकारणी स्थापन करण्यात आली
खालीलप्रमाणे
1)प्रदीप वाघमारे:-जिल्हा अध्यक्ष तालुका.लोहा
2)पप्पू दुगाळे:-जिल्हा उपाध्यक्ष ता हदगाव.
3)शशिकांत पवार:-जिल्हा सचिव ता नायगाव.
4)संग्राम इंगळे:- जिल्हा कार्याध्यक्ष ता मुखेड.
5)विजय टापरे :- जिल्हा सहसचिव ता कंधार.
6) मारोती चव्हाण :- जिल्हा संघटक ता मुदखेड.
7) नारायण आढाव :- जिल्हा सल्लागार ता लोहा.
8) माधव मलगये:- जिल्हा प्रसिद्धी प्रमुख:- ता बिलोली
9) सलिम पठाण:- जिल्हा सदस्य ता हदगाव.
10)राजू तायवडे :- जिल्हा सदस्य ता अर्धापुर.
11) राजु कवले :- जिल्हा सदस्य. ता अर्धापुर.
वरील जिल्हा कार्यकारणी ला राज्य कार्यकारिणी ने नियुक्ती पत्र देऊन पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी नांदेड जिल्ह्यातील कार्यरत ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती सुत्रसंचालन संतोष पाळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजु मोळके यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button