क्राईमताज्या बातम्यापुणेमहत्वाचेमहाराष्ट्र
पुणे येथे सराईत वाहनचोरासह २ भंगार व्यावसायिकांना अटक ..

पुणे : सराईत वाहनचोरासह भंगार व्यावसायिकांना अटक करून दुचाकी चोरीचे ११ गुन्हे उघड झाले आहेत. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सुधीर कांबळे आणि मयूर हराळ, तसेच भंगार व्यावसायिक रशीद शेख आणि अन्वर शेख यांना अटक केली आहे.
कामगिरी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने केली आहे. सुधीरला अटक केल्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याने इतर दुचाकी गाड्या चोरल्याचे मान्य केले. निगडी आणि दिघी ठाण्याच्या परिसरातील प्रत्येकी २, चिखली आणि चिंचवड ठाण्याच्या परिसरातील प्रत्येकी ३, तर सांगवी परिसरातील १ असे ११ वाहन चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत.