सारथी संशोधकांना अधिछात्र वृत्ती नोंदणी दिनांका पासुन मंजुर करा – अभ्यासक राजेंद्र दाते पाटील
मुख्यमंत्र्या कडे मागणी
सारथी संशोधकांना अधिछात्र वृत्ती नोंदणी दिनांका पासुन मंजुर करा – अभ्यासक राजेंद्र दाते पाटील
प्रतिनिधी – सारथी संशोधक अधिछात्र वृत्ती नोंदणी दिनांका तात्काळ मंजुर करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी केली.
आपल्या सविस्तर निवेदनात त्यांनी नमुद केलें की,छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था, पुणे यांचे वतीने संशोधन (पी.एच.डी) साठी पात्र आलेल्या मराठा ( कुणबी मराठा ) समाजा तील संशोधकांनी पीएच.डी.साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना संशोधन अधि छात्रवृती देण्याचा अभिनव उपक्रम राबवत आहे. सारथी संस्थेमार्फत पीएच.डी. साठी (सी एस एम एन आर एफ २०२२) करीता मुलाखत व मुळकागदपत्र पडताळणी प्रक्रियेस उपस्थित सर्व ८५१ विद्यार्थ्यांची अंतिम निवड सारथी च्या वतीने करण्यात आली होती.
राज्यातील इतर संस्था स्थापना झाल्या पासुन ते आज तगायात नोंदणी दिनांका पासून अधिछात्रवृत्ती देते,परंतू सारथी ही संस्था अंतिम निवड झालेल्या पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिंनाका पासून संशोधन अधिछात्र वृत्ती देत नाही हे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी वेळोवेळी मुख्मंत्र्यांकडे स्पष्ट केलेले आहे. संबंधित विषयी मराठा विद्यार्थ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा या अपेक्षेने त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घालून सदर मागणीचा गांभीर्याने विचार करून उपरोक्त मागणी तात्काळ मंजुर करण्याचे आदेश संबंधित वविभागास द्यावा आणि मराठा विद्यार्थ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा या अपेक्षेने उपरोक्त विषयी जातीने लक्ष घालून उपरोक्त विषयांकीत बाब व मागणी तात्काळ मंजुर करण्याचे आदेश डॉ.राजपाल देवरा अवर सचिव,नियोजन विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांना नुकतेच दिले असुन त्या बाबतचा उलट टपाली मेल मुख्यमंत्री कार्यालयातुन जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांना प्राप्त झाला आहे.
खास बाब म्हणजे राजेंद्र दाते पाटील हे मुख्य हस्तक्षेप याचीका कर्ता सर्वोच्च न्यायालय,नवि दिल्ली येथे मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा देत आहेत.
सारथी संस्थेच्या वतीने शिफारस असलेला संचालक मंडळाचा ठराव सुद्धा कार्यकारी संचालक अशोक काकडे यांनी पाठवलेला आहे.