Manoj Jarange Patilमराठा आरक्षण

जास्त घेतल्यामुळे भाषणात विसरण्याचा,छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही,छगन भुजबळ यांचा जरांगे यांच्यावर घणाघाती हल्ला


छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी अशा कोल्हेकुईला भीक घालत नाही. त्यांच्या जन्माच्या आधीपासून मी आंदोलन करतोय, असं सांगतानाच त्यांच्या भाषणातच विसंगती होती. जास्त घेतल्यामुळे त्यांना विस्मरणाचा त्रास झाला असेल, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.



छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांच्या प्रत्येक टीकेचा समाचार घेतला. तुला बघतो… तुला बघतो असं ते सारखं बोलत होते. छगन भुजबळ अशा कोल्हेकुईला दाद देत नाही. भुजबळ आयुष्यभर अशा दादागिरीच्या विरोधात लढला आहे. तुमच्या जन्माच्या आधीपासून भुजबळ लढत आहे, असा पलटवार छगन भुजबळ यांनी केला आहे.

आरे केलं तर कारे होईलच

कधी म्हणतात येवल्याचा येडपट आहे. मी जर म्हटलं… (हातवारे करत इशारा) ते बोलायचं नाही असं ठरलं आहे. जास्त घेतल्यामुळे त्यांच्या भाषणात विसरण्याचा भाग जास्त आला. जास्त घेतल्याचा हा परिणाम आहे. आता ते 20 जानेवारीपर्यंत शांत बसणार आहेत. ते हॉस्पिटलमध्ये राहतात. ते एक तर हॉस्पिटलमध्ये तरी राहतात किंवा बाहेर तरी. त्यांची 12 इंचीची छाती आहे. छाती जास्त ठोकू नका. छातीत गडबड होईल. तब्येत सांभाळा. अरे म्हटलं तर कारे होईलच. सारखं सारखं बोलत राहिला तर मला बोलावं लागेल, असं भुजबळ म्हणाले.

chhagan bhujbal

भुजबळांवर टीका नाही केली तर काय बोलणार?

त्यांचं अर्ध भाषण फक्त भुजबळ यांच्यावरच होतं. नंतरच भाषण लेकरं वगैरे वगैरेवर होतं. भुजबळांवर बोललं नाही, टीका केली नाही तर भाषणात बोलणार काय? मी कालच म्हटलं व्याह्यांना आरक्षण द्या. व्याह्यांच्या व्याह्यांना आरक्षण द्या. पण तो मुद्दा त्यांनी आज घेतला नाही. काय झालं माहीत नाही. त्यांच्या स्मरणशक्तीत गडबड आहे. एकाच भाषणात दुहेरी बोलतात.

हॉटेल भुजबळ किंवा त्यांच्या माणसांनी जाळलं, असं सुरुवातीला म्हणाले. म्हणे मराठ्यांना डाग लावला. आधी म्हणाले सरकारी अधिकाऱ्यांनी घरं आणि हॉटेल जाळलं. आता भुजबळांचं नाव घेत आहेत. थोड्यावेळाने म्हणतात, मराठ्याच्या वाट्याला जाऊ नका. बीडला काय होतं ते लक्षात ठेवा. म्हणजे बीडला जे झालं ते तुम्हीच केलं हे सिद्ध होतं ना? तुम्हीच कबूल केलं आहे. त्यामुळे त्यांनी थोडं आलोम, विलोम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी, त्यांच्या भाषणात विसंगीत येणार नाही, असा चिमटा भुजबळांनी लगावला.

https://maharashtranews24.co.in/?p=1011


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button