पिंपरी गोळीबारानं हादरली; सराईत गुन्हेगाराकडून हार-फुले विक्रेत्यावर गोळीबार
पुणे: (आशोक कुंभार )पुण्यातआणिपिंपरी-चिंचवडमध्ये सातत्याने गुन्हेगारीची प्रकरणं वाढत आहे. त्यात क्षृल्लक कारणामुळे गोळीबार केल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड परिसरातून समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून एका हार फुले विक्रेत्यावर गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना दिघी परिसरात घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली. शनिवारी (दि.18) रात्री साडे बाराच्या सुमारास चऱ्होली बु. येथील बाआरटी काटे कॉलनी, चोविसावाडी येथे घडली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत 28 वर्षीय सिद्धेश सिताराम गोवेकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी हरीओम पांचाळ आणि त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पांचाळ हा सराईत गुन्हेगार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धेश गोवेकर आणि आरोपी हरीओम पांचाळ हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.फिर्यादी आणि आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.पूर्वी ते एकत्र असताना त्यांच्यात वाद झाले होते.शनिवारी रात्री सिद्धेश हा त्याच्या केटीएम वरुन आळंदी येथून घरी जात होता.त्यावेळी आरोपीने त्याच्या गाडीचा पाठलाग केला होता.
घटनेमुळे खळबळ
रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. क्षृल्लक कारणावरुन होणाऱ्या गोळीबारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गोळीबाराने पुणे हादरलं…
पुण्यात किरकोळ वादावरुन होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यात अनेकजण सर्रास हवेत गोळीबार करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सकाळीच शेकोटी पेटवण्यावरून झालेल्या किरकोळ वादामधून हवेमध्ये गोळीबार (Firing) करण्यात आल्याची घटना घडली होती. पुण्यातील वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूल समोर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. गोळीबारानंतर परिसरात खळबळ उडली होती. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमित सिंग यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा ब्रॅंड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी असून त्यांच्या आठ ते नऊ फ्रॅन्चायजी दिलेल्या आहेत. ते कल्याणी नगरमधील सिलीकॉन बे येथे राहतात. तेथील रस्त्याच्या डेड एन्डला एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते. त्यावेळी ही घटना घडली.