अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकर्याच्या सौर पॅनलचे नुकसान
वाशिम : (आशोक कुंभार ) उन्हाळ्याच्या तोंडावर गहू, हळद, करडीचे पिक ऐन भरात आले असतांना गेल्या दोन ते तीन दिवसापासून अचानक आलेला वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेतकर्याच्या उभ्या पिकाचे नुकसान होत असून, शेतात लावलेल्या सौर उर्जा पॅनललाही मोठा तडाखा बसत आहे. मालेगाव तालुयात १६ मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वार्यामुळे ग्राम वाघळुद येथील महिला शेतकरी गंगा विठ्ठल देशमुख यांच्या शेतात लावलेल्या सौर उर्जा पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गंगा देशमुख यांनी पीएम कुसुम योजनेअंतर्गत आपल्या शेतात जुन्ना सोलर कंपनीचे सौर पंप व पॅनल आपल्या शेतात बसविले होते. मात्र, वादळी वारा व गारपीटीमुळे या सौर पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हे पॅनल गाराच्या तडाख्यात सापडून ठिकठिकाणी फुटले आहे. तालुयात अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकर्यापुढे नवे आव्हान उभे ठाकले आहे.