ताज्या बातम्या

चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीनंतर गौरव बापट यांचे पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य, म्हणाले.


भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती.लोकसभा पोटनिवडणुक झाल्यास गौरव बापट किंवा त्यांच्या पत्नी स्वरदा बापट या दोघांपैकी एक निवडणुक लढवेल अशी चर्चा सुरू होती.मात्र अद्याप पर्यंत निवडणुक आयोगा मार्फत कोणताही निवडणुक होण्याचा कार्यक्रम जाहीर केला नाही.त्याच दरम्यान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गौरव बापट आणि कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.चंद्रकांत पाटील यांनी बापट कुटुंबीयां सोबत जवळपास तासभर चर्चा देखील केली.भेटी बाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.तर गौरव बापट यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, 3 सप्टेंबर रोजी स्व.गिरीश बापट यांची जयंती असून त्यानिमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करीत आहोत,त्या कार्यक्रमाला कोणत्या नेत्यांना आमंत्रित करायचे, त्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांच्या सोबत चर्चा झाली.तसेच ओंकारेश्‍वर मंदिर आणि कसबा गणपती मंदिरासाठी राज्य सरकार मार्फत तीर्थ क्षेत्रांना दिल्या जाणार्‍या निधी बाबत चर्चा झाली आहे.त्याच बरोबर चंद्रकांत पाटील यांची कौटुंबिक भेट होती.आमच्यात कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याच त्यांनी यावेळी सांगितले.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button