वडार समाजाला तब्बल ७५ वर्षांनी महाराष्ट्र शासनाने मिळवून दिला न्याय..
आभार व धंन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब व विशेष आभार वडार समाजाचे कैवारी माननीय आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब..
वडार समाजाला तब्बल ७५ वर्षांनी महाराष्ट्र शासनाने मिळवून दिला न्याय..
महाराष्ट्र : ( आशोक कुंभार ) भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 75 वर्षानंतर वडार समाजाला पहिल्यांदाच न्याय मिळालेला आहे. वडार समाजातील जागतिक कीर्तीचे कुस्तीपटू कै. पैलवान मारुती वडार आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने स्थापन केले. यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि औसा विधानसभेचे आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांचे आभार मानण्यासाठी सागर बांगला उपमुख्यमंत्री निवासस्थान “सागर” या ठिकाणी शिवक्रांती वडार फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच महाराष्ट्रातील इतर संघटना, संस्था यांचेही कार्यकर्ते, सदस्य उपस्थित राहिले होते.
संपूर्ण महाराष्ट्रातून शिवक्रांती वडार फॉउंडेशन चे सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य, तसेच इतर वडार समाज संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बंधू भगिनीं काल मुंबई इथे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि औसा विधानसभा चे आमदार श्री अभिमन्यू पवार साहेब यांचे आभार मानण्यासाठी दाखल झाले होते. हा वडार समाजाचा जनसागर आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि वडार समाजाला इतिहासात सर्वप्रथम मिळालेल्या मानसन्मानाप्रति आभार व्यक्त करण्यासाठी दाखल झाला होता. वडार समाजाकडून या दोघांचाही सत्कार करण्यात आला आणि आभार मानन्यात आले. विशेष म्हणजे हा वडार समाजाचा मानसन्मान, तसेच समजउन्नतीसाठी विद्यमान शासनाने दखल घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रात वडार समाजाचा मान वाढल्यामुळे, समाजातील सर्वांनी टोपी परिधान करून आणि वडार समाजाची निशाणी असलेले पिवळे शाल परिधान करून आनंद व्यक्त केला. सर्व संस्था, संघटना यासाठी एकत्र आलेले दिसून आले. समाजाला मिळालेल्या न्यायाप्रति हे सर्वजण एकत्र आले आणि जल्लोष केला ही विशेष!!! सर्वांनी दिलेल्या “जय बजरंग, जय वडार” अशा घोषणा देऊन परिसर व्यापून गेला.
वडार समाजाने याचवेळेस वडार समाजाला सतत मदत करणारे आणि मदतीला धावून येणारे श्री नितीन भाऊ वाघमारे यांचेही यावेळी आभार मानन्यात आले.
तब्बल ७५ वर्षांनी वडार समाजाला न्याय मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वडार समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. श्री अभिमन्यू पवार म्हणजे देवरुपाने आपल्यासाठी धावून आलेले कल्याणकारी आमदार आहेत अशी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाज बंधू भगिनीं देत आहेत.