शिवक्रांती वडार फाउंडेशन चे निर्भेळ यश
शिवक्रांती वडार फाउंडेशन चे निर्भेळ यश
महाराष्ट्र : ( आशोक कुंभार ) गेले दोन वर्ष सतत अथक परिश्रमाने, आपल्या ग्राउंड लेव्हलवर कार्यरत असणारे शिवक्रांती वडार फाउंडेशन चे सर्व सदस्य पदाधिकारी यांना मिळालेले यश म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेले वडार समाजासाठी एक स्वतंत्र आर्थिक विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ होय.
वडार समाजाच्या इतिहासामध्ये प्रथमच अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. या निर्णय पाठीमागे वडार समाजातील सध्याची तरुण पिढी जी शिव क्रांती वडार फाउंडेशनच्या माध्यमातून सतत प्रयत्नशील होती यांना द्यावे लागेल.
लातूरच्या मेळाव्यापासूनच सर्व तरुण वर्ग वडार समाजासाठी एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या मागे लागले होते. त्यामध्ये औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार साहेब ज्यांना वडार समाजाविषयी अतिशय आस्था आहे आणि ते नेहमी सतत वडार समाजाचे भले व्हावे म्हणून कार्यरत असतात यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरवठा करून वडार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यामध्ये योगदान दिले आहे. त्यामुळे वडार समाज सतत त्यांचा ऋणी राहील.
शिव क्रांती फाउंडेशन चे सर्व महाराष्ट्रभरातील सदस्य, सर्व विभाग प्रमुख जिल्हाध्यक्ष तालुकाप्रमुख यांनी सतत आपल्या आपल्या माध्यमातून सरकारचा पाठपुरवठा केला. आणि त्यातूनच मिळालेले ही यश म्हणजे वडार समाजासाठी झालेला अत्यंत महत्त्वाचा निर्णय होय.
महाराष्ट्र शासनाचे आणि औसा विधानसभा चे आमदार श्री अभिमन्यू पवार यांचे वडार समाजाकडून शतशः आभार.