ताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाखाचा पोशिंदा मरतोय; विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरले…


मुंबई: (आशोक कुंभार )शेतकऱ्यांच्या जीवावर हे सरकार सुरू असताना लाखाचा पोशिंदा मरत आहे, अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या ;वेलमध्ये उतरत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव उपस्थित केला.शेतकर्‍यांच्या जीवावर हे सरकार चालेल आहे. लाखाचा पोशिंदा संपतोय…याबाबत सरकारला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात जाब विचारला.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले याबाबतचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्यावतीने सभागृहात मांडला मात्र तो नाकारण्यात आला. त्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर जोरदार घोषणाबाजी केली.

महिला दिनी सरकार मदत करेल, शेतकऱ्यांना दिलासा देईल असे वाटले होते मात्र मुख्यमंत्र्यांनी नुकसान भरपाई जाहीर करायला हवी होती मात्र ती केलीच नाही यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या करत आहेत हे काय चाललंय आहे. शेतकरी चिंतातूर, हवालदिल झाला आहे. हे सभागृह नियमाने चालते मान्य आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्नच सुटणार नसतील तर काय उपयोग आहे निव्वळ प्रश्नोत्तरे घेऊन असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अध्यक्षांना केला. आमदार छगन भुजबळ आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारला.

दरम्यान विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या प्रस्तावावर अध्यक्ष चर्चा करायला तयार नसल्याने महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होऊन वेलमध्ये उतरले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर देत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले. तरी विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button