ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई
गॅसचा भडका उडाला पण गृहणींना तेलाने तारलं

मुंबई : काही दिवसांपुर्वीच देशातील सर्वसामान्यांना झटका देत केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडर सह व्यापारी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कमालिची दरवाढ केली होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रूपयांनी वाढ करण्यात आली होती.मात्र आता गृहणीसाठी एक आनंदाची बातमी आहे. या बातमीमुळे गृहणींचे बिघडलेली बजेट काही प्रमाणात आवाक्यात येण्यास मदत होणार आहे. खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने गृहणी महिला मोठी बचत करू शकतील. खाद्यतेलाच्या दर १० टक्क्यांनी घसरण झाली आहे. जागतिक बाजारपेठेत घरसण झाल्याने भारतीय बाजारपेठेत याचे परिणाम दिसून आल्याने खाद्यतेलाच्या किंमतीत हा फरक दिसत आहे.