पंतप्रधान आवास योजनेची नवीन यादी जाहीर
भारत:देशात आजही मोठ्या प्रमाणात गरीब नागरिकांना पक्के घरे नाहीत. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारकडून पंतप्रधान आवास योजना सुरु करण्यात आली आहे या योजनेतून ज्या नागरिकांना पक्की घरे नाहीत त्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे.
देशातील गरीब नागरिकांसाठी आता केंद्र सरकारकडून अनेक मोठमोठे निर्णय घेतले जात आहेत. आता पंतप्रधान आवस योजनेची नवीन यादी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. ज्या लोकांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
पंतप्रधान अवास योजना नवीन यादी 2023
आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले नागरिक ज्यांच्याकडे पक्की घरे नाहीत आणि त्यांना पक्की घरे बांधण्यासाठी पैसे नाहीत अशा नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतून २.५ लाख रुपये दिले जातात. यामुळे नागरिकांना घर बांधण्यासाठी आर्थिक हातभार लागत आहे.