व्यापाऱ्याने अडाणी समजून केले मापात पाप. शेतकरी राजा भडकला.
बुलढाणा, 29 नोव्हेंबर : बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल भागात शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीत हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी रंगे हात पकडून धो धो धुतला आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात झाला. बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर अकोट येथील व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस जादा भावाने खरेदी करण्याचे आमिष दाखवून कापूस खरेदीत वजन काट्यात हेराफेरी करून शेतकऱ्यांची लूट करीत होता.यावेळी शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्याला वजन काट्यामध्ये घोळ करून क्विंटल मागे तब्बल वीस किलो कापूस कमी मोजत असताना रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन अनेक व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कापूस खरेदी करत आहेत.मात्र कापूस खरेदी करताना वजन काट्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोळ असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लाडनापूर येथील या घटनेत शेतकऱ्यांनी वजन काट्यामध्ये घोळ करणाऱ्या या व्यापाऱ्याला चांगला चोप दिला आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.जलसमाधी आंदोलनाच्या धसक्याने राज्याच्या कृषी विभागाने पीकविमा कंपन्यांना पीकविमा रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात ४० लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे 2148 कोटी रुपये पीकविमा मंजूर झाला आहे.आतापर्यंत कंपन्यांनी 942 कोटी रुपये जमा केले आहेत व कंपन्यांकडे 1205 कोटी रुपये बाकी आहेत. तसेच पोस्ट हार्वेस्टिंगचा पीकविमा अजून बाकी आहे. परंतु काही ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवली आहे. काही कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पैसे जमा करून फसवणूक केली आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील AIC कंपनी शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आघाडीवर आहे. शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियम पेक्षाही कमी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे.