क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

बाप की हैवान! लेकीच्या ‘त्या’ प्रायव्हेट पार्टला स्पर्श करायचा; किळसवाणी मिठी मारायचा, शेवटी कंटाळून…


मुंबई: मुंबईतील दहिसर परिसरात (Crime News) एका १४ वर्षीय मुलीवर तिच्या (Mumbai News) सावत्र बापाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना (Mumbai Crime) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे.

त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking News)

जवळीक साधण्याचा प्रयत्न

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहिसर परिसरात राहते. तिचा सावत्र बाप गेल्या काही दिवसांपासून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला मिठी मारणे, छातीला अश्लील स्पर्श करणे असे वाईट कृत्य करून तिचा विनयभंग करत होता. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याने ती खूप घाबरली होती. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. (Marathi News)

धैर्य दाखवत पोलिसांत तक्रार

दोन दिवसांपूर्वी या नराधमाने पुन्हा एकदा तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, तिने धीर धरून दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी या घटनेची तातडीने गंभीर दखल घेतली.

पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

दहिसर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत सावत्र बापाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि काही तासांतच आरोपीला अटक केली. अटकेनंतर त्याला दिंडोशीतील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button