क्राईमताज्या बातम्यापुणे

धक्कादायक ! सासू-सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या देत प्रियकराशी घरी ठेवायची संबंध …


पुणेःपुणे शहरातील एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातून एक धक्कादायक आणि लाजिरवाणी घटना समोर आली आहे. या कुटुंबातील लहान सूनेने आपल्या सासू-सासऱ्यांना झोपेच्या गोळ्या देऊन गुंग ठेवत घरातच प्रियकराला बोलावून संबंध ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

काही महिन्यांपासून वृद्ध दांपत्याला झोपेचा अनियमित त्रास जाणवत होता. त्यांनी फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर खरी कारणमीमांसा समोर आली. वैद्यकीय तपासणीत सासू-सासऱ्यांच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे अतिप्रमाण आढळले. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये संशय निर्माण झाला. वृद्ध दांपत्याची मोठी सूनही तपासणीसाठी गेली असता तिच्या रिपोर्टमध्येही अशाच गोळ्यांचे अंश आढळले. परंतु लहान सूनेच्या तपासणीत काहीही सापडले नाही. यामुळे संशयाची सुई तिच्याकडे वळली. कुटुंबाने अखेर नामांकित खासगी गुप्तहेर प्रिया काकडे यांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला.

प्रिया काकडे यांनी अत्यंत हुशारीने लहान सूनेशी संपर्क साधला आणि तिच्याशी मैत्री केली. काही दिवसांतच त्यांनी धक्कादायक पुरावे गोळा केले. चौकशीत समोर आलं की, लहान सून आपल्या सासू-सासऱ्यांच्या नाश्त्यामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळायची. ते झोपल्यावर दिवसा घरातच आपल्या प्रियकराला बोलावून घ्यायची आणि त्याच्यासोबत संबंध ठेवायची.

लहान मुलाच्या शारीरिक व्यंगामुळे त्याच लग्न उशिरा झाल होत. त्याची पसंती पाहून लग्न लावण्यात आल, मात्र काही महिन्यांनंतरच या प्रकाराने कुटुंब हादरले. प्रिया काकडे यांनी मिळवलेल्या पुराव्यांवरून लहान सूनेन आपली चूक मान्य केली. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, तपासादरम्यान सूनेनं चोरून ठेवलेले दागिने आणि रोकडही परत मिळाली आहे. या घटनेनंतर संबंधित व्यापारी कुटुंबाने आपल्या मुलगा-सुनेचा घटस्फोट करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण परिसरात या प्रकाराची जोरदार चर्चा असून, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button