
बहुजन युथ पँथरच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीणकुमार तथा पप्पू कांबळे यांची निवड…
बीड : बहुजनांच्या लढ्यामध्ये सतत अग्रेसर असलेले युवकांमध्ये डॅशिंग आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे प्रवीण कुमार तथा पप्पू कांबळे यांची नुकतीच बहुजन युथपँथरच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रवीणकुमार तथा पप्पू कांबळे यांच्या निवडीमुळे बहुजन चळवळीला एक खमक्या युवा नेतृत्व मिळाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
बहुजन युथ पँथरचे प्रदेशाध्यक्ष राकेश भाई सुपारे यांनी नुकतेच या निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे. पॅथर राकेश भाई सुपारे यांनी नियुक्ती पत्रकात असे म्हटले आहे की, प्रवीणकुमार तथा पप्पू कांबळे यांनी शोषित, पीडित, दलित, आदिवासी, मुस्लिम, भटक्या जाती जमाती, शेतमजूर, कामगार, बहुजन, सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी, युवक, अपंग वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढत राहावे, याकरिता प्रवीणकुमार तथा पप्पू कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की, प्रवीणकुमार तथा पप्पू कांबळे यांच्यावर दिलेली जबाबदारी ते यशस्वीरित्या पार पडतील.











