क्राईम

5 कोटी कॅश, 1.5 किलो सोनं, मर्सिडिज-ऑडीसारख्या कार अन् बरंच काही..सीबीआयला DIG कडे सापडलं घबाड!


पंजाबमध्ये 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक झालेला पोलीस उपमहानिरीक्षक (DIG)हरचरण भुल्लर धनकुबेरचं निघाला. सीबीआयच्या छापेमारीत डीआयजी आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणांहून 5 कोटी कॅश,1.5 किलो सोन्यासह मर्सिडिज-ऑडीसारख्या लक्झरी कारच्या चाव्या मिळाल्या आहेत.या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडलेल्या पैशांची मोजणी अद्यापही सुरुच आहे.

त्यामुळे पैशांचा आकडा आणखी वाढू शकतो.सीबीआयने आज गुरुवारी रोपडचे DIG हरचरण भुल्लरला 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पडकलं होतं. त्यानंतर सीबीआयने त्याच्या अनेक ठिकाणांवर धाडी टाकल्या. या छापेमारीत पोलिसांनी कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, अनेक फ्लॅल्ट्स आणि जमिनीचे कागदपत्रे, मर्सिडीज-ऑडीसारख्या लग्झरी कारची चावी मिळाली आहे.

डीआयजी आणि एका व्यक्तीला केली अटक

सीबीआयने पंजाब पोलिसांच्या एका डीआयजीसह एका व्यक्तीला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. हे प्रकरण एकूण 8 लाख रुपयांचं आहे. पण तपासात कोट्यावधी रुपयांची कॅश आणि लग्झरी सामानही जप्त करण्यात आलं आहे.रिपोर्टनुसार, अटक केलेला पोलीस अधिकारी 2009 बॅचचा आयपीएस अधिकारी आहे. हा अधिकारी रुपनगर(रुपनगर रेंज) मध्ये कार्यरत होता.

उद्योगपतीकडे मागितले होते 8 लाख रुपये

सीबीआयने म्हटलंय,तक्रारदाराने आरोप लावला होता की, डीआयजीने एका जवळच्या व्यक्तीद्वारे 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. जेणेकरून त्याच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा सेटल करता येईल आणि पुढे कोणतीही कारवाई होणार नाही. याशिवाय, पोलीस अधिकारी प्रत्येक महिन्यालाही खंडणी मागायचा, असाही आरोप करण्यात आला आहे. सीबीआयने पोलीस तपासानंतर सापळा रचला आणि चंदीगढच्या सेक्टर 21 मध्ये डीआयजीच्या जवळच्या व्यक्तीला 8 लाख रुपयांची लाच घेताना पकडलं. ट्र्रॅपच्या वेळी, सीबीआयने डीजीआयला एक कंट्रोल्ड कॉलही केला. यामध्ये त्याने रक्कम घेतल्याचं कबूल केलं आणि तक्रादार आणि त्याच्या साथीदाराला ऑफिसमध्ये बोलावलं. त्यानंतर सीबीआयने अटकेची कारवाई केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button