लव्ह सेक्स और धोखा! पीएचडी धारकाचं घृणास्पद कृत्य, महिलेच्या अब्रुचे तोडले लचके…

मुंबईच्या वांद्रे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये अमेरिकेत पीएचडी करणाऱ्या 29 वर्षीय रिसर्च स्कॉलरवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओळखीतील व्यक्तीमार्फत झालेल्या परिचयानंतर आरोपीनं पीडितेचं अमेरिकेत आणि मुंबईत लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोअर परळ परिसरातील रहिवासी असून पीडित महिला माहिमची आहे. पीडित महिला आणि आरोपी दोघंही अमेरिकेतील इलिनॉईस युनिव्हर्सिटी अर्बाना-शॅम्पेन (UIUC) येथे उच्च शिक्षण घेत आहेत. या दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडमार्फत झाली होती. पहिल्या भेटीनंतर काही काळातच दोघांमध्ये जवळीक वाढली.
हॉटेलमध्ये बोलावून केलं घृणास्पद कृत्य
आरोपीनं पीडितेला शैक्षणिक चर्चेसाठी वांद्रे येथील एका आलिशान हॉटेलमध्ये बोलावलं होतं. मात्र, तिथं त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना 1 जानेवारी ते 12 जून 2025 दरम्यान घडली. इतकंच नाही तर आरोपीनं अमेरिकेतही लैंगिक शोषण केल्याचं पीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
विवाहाचं आमिष दाखवून वारंवार अत्याचार
पीडितेनं आरोपीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपीनं विवाहाचं आमिष दाखवून अमेरिकेतही वारंवार अत्याचार केले. मात्र, आरोपी इतर मुलींशीही विवाहाबाबत बोलत आहे, हे पीडितेला समजलं. याबाबत तिने आरोपीला जाब विचारला असता त्यानं तिला शिवीगाळ करत बेदम मारहाणही केली. इतकंच नाही तर प्रायव्हेट फोटो व व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली. धक्कादायक म्हणजे तिला पेटवून देण्याची धमकी दिली.
आईला सांगितली आपबीती
मानसिक आणि शारीरिक अत्याचारांना कंटाळून अखेर पीडितेनं आईला आपली आपबीती सांगितली. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. मायलेकीनं वांद्रे पोलिस स्टेशन गाठलं आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी आता वांद्रे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपी सध्या अमेरिकेत असून तो भारतात परतल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.











