देश-विदेश

पाकिस्तान-चीनची उडाली झोप, भारतात तयार होणार हे घातक क्षेपणास्त्र, जगाने घेतला धसका…


भारत-पाकिस्तानमध्ये मोठ्या युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन हल्ले करत होती. भारताने पाकिस्तानच्या ड्रोनचा धुव्वा उडवला. हेच नाही तर पाकिस्तानी लष्कराचे विमान देखील पाडली.

पाकिस्तानातील महत्वाचा लष्करी एअर बेसचे देखील मोठे नुकसान केले. भारताची ताकद पाहून पाकने थेट अमेरिकेचे पाय धरली. या युद्धात भारताने S-400 ची क्षमता जगासमोर दाखवली. पाक ड्रोन हवेतच उडवली. या रशियन हवाई संरक्षण प्रणालीने भारतीय सैन्याला प्रभावित केले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्कराला मोठा धक्का बसला. भारताच्या सुरक्षेसाठी S-400 अत्यंत महत्वाचे आहे. यामुळेच आता भारताने अत्यंत मोठा निर्णय S-400 बद्दल घेतला आहे.

भारत रशियाकडून आणखी पाच S-400 खरेदी करणार आहे. भारताने 2018 मध्ये रशियाकडून अत्याधुनिक प्रणालीच्या S-400 चा 5.43 अब्ज डॉलर्सचा करार केला. पुढील वर्षात रशिया भारताला अजून दोन S-400 देणार आहे. पाच S-400 खरेदी करण्याबाबत सध्या बोलणी सुरू आहे. यापेक्षाही महत्वाचे म्हणजे आता भारतातच S-400 ची निर्मिती केली जाणार आहे. भारत आणि रशिया यांनी पाच अतिरिक्त प्रणालींच्या किमतीवर सहमती दर्शविली आहे.

S-400 तंत्रज्ञान हस्तांतरण अंतर्गत यापैकी तीन प्रणाली थेट खरेदी करण्यासाठी आणि उर्वरित दोन प्रणालींचे उत्पादन करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे रशियाकडूनही भारताला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. दोन्ही सरकार मिळून हा करार करतील. भारतीय खाजगी क्षेत्राच्या मदतीने याची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी सर्व गोष्टी केल्या जातील.

7 मे रोजी पाकिस्तानने आदमपूर आणि भुज हवाई तळांवर तैनात असलेल्या S-400 सिस्टीमला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांचा हा प्रयत्न अपयशी झाला आणि त्यांनाच मोठे नुकसान सहन करावे लागले. भारतामध्येच S-400 ची निर्मिती झाली तर हा मोठा फायदा भारतासाठी राहणार आहे. पाकिस्तानसोबतच चीनची देखील झोप उडाल्याचे यामुळे बघायला मिळतंय. भारतीय लष्कराची ताकद आता वाढणार असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button