Social Viral Newsबीड

बीड पत्नीला कारमध्ये प्रियकर API सोबत रंगेहाथ पकडले, मग पतीने भर रस्त्यात बदडले …


बीड : बीडमध्ये असताना एका विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर धाराशिवला बदली झाली. पिस्तूलचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यानंतर महिन्यापासून त्याच पीडितेवर पुन्हा प्रेम जडले.

दोघेजण कारमधून फिरताना पतीने रंगेहाथ पकडले. त्यानंतर भर रस्त्यावर प्रियकर असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे याला कपडे फाटेपर्यंत बदडले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी २ वाजता बीड शहरातील बसस्थानकासमोर घडला. अजब प्रेमाच्या या गजब कहाणीची जोरदार चर्चा सुरू आहे.

आरोपी रवींद्र शिंदे हे २०१३ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून बीड पोलिस दलात दाखल झाले. ते पीडितेच्या शेजारी राहत असल्याने त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. नंतर शिंदे यांची बदली धाराशिवला झाली. मात्र, तिथेही त्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून पीडितेवर घरात घुसून अत्याचार केल्याचा आरोप आहे. अत्याचारप्रकरणी जुलै महिन्याच्या अखेरीस शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून शिंदे फरार होते. मात्र, शुक्रवारी दुपारी पीडिता आणि शिंदे कारमधून फिरताना पीडितेच्या नवऱ्याने पाहिले आणि संतापाच्या भरात भररस्त्यावरच शिंदे यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. या अजब प्रेमकहाणीमुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे.

पीडिता आणि रवींद्र शिंदे हे कारमधून फिरत होते. पीडितेच्या पतीने त्यांना पाहताच पाठलाग सुरू केला. तुळजाई चौक, नगर नाका आणि बसस्थानक मार्गे बाहेर निघण्यापूर्वी पतीने दुचाकी आडवी लावून शिंदे यांना कारमधून खाली खेचले आणि कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. पीडिता त्या वेळेस तोंड बांधलेल्या अवस्थेत कारमध्ये बसली होती. हाणामारीचा हा वाद पोलिसांनी मिटवण्याचा प्रयत्न केला आणि पीडितेसह तिच्या पतीला पकडले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

पीडिता तीन दिवसांपासून घरातून गायब होती, ज्यामुळे तिच्या पतीला संशय आला. शुक्रवारी दुपारी हा संशय खरा ठरला. पतीने पीडिता आणि एपीआय रवींद्र शिंदे यांना कारमध्ये रंगेहाथ पकडले. दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेले. पीडितेने शिंदेविरोधात तक्रार देण्याऐवजी पतीवर आरोप केला, मात्र पोलिसांकडे सर्व माहिती असल्याने तिला शांत करून तक्रारीवर आधारित शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button