हत्या होणार होती पतीची पण जीव गेला प्रियकराचा, पती,पत्नी आणि वो नेमक घडल काय?

एका व्यक्तीची हत्या होणार होती. हल्लेखोर त्याच्या घरापर्यंतही पोहोचले. पण ज्याची हत्या होणार होती, तो हुशार निघाला. म्हणून तो बचावला. आता पोलीस त्याचा शोध घेत होते, ज्याने हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला.
पण पोलीस हल्लेखोरापर्यंत पोहोचणार, त्याआधी एक व्हिडिओ समोर आला. त्यानंतर हल्लेखोराचा मृतदेह. या प्रकरणात तिसरा म्हणजे जो ‘वो’ होता त्याच्या नशिबी आला मृत्यू. कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातील इंडी टाऊन येथे शेतकरी बीरप्पाच घर होतं. तो पत्नी सुनंदा आणि दोन मुलांसह आनंदात राहत होता. छोट्या-मोठ्या तक्रारी सोडल्या, तर 31 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत सर्वकाही ठिकठाक होतं. पण 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरच्या रात्री दरम्यान बीरप्पा सोबत जे घडलं, त्याने रातोरात सगळं काही बदलून टाकलं.
पत्नी आणि मुलांसोबत बीरप्पा घरी झोपला होता, त्यावेळी त्याला मोठा धक्का बसला. घरात घुसलेल्या व्यक्तीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बीरप्पाने कसतरी करुन हल्लेखोराच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. त्याने आरडोओरडा सुरु केला. आसपासचे शेजारी तिथे जमले. त्यामुळे घरात घुसलेल्या हल्लेखोराला तिथून पळून जावं लागलं.
बीरप्पासाठी हा धक्का होता
या हल्ल्याच्यावेळी एक मोठं सत्य समोर आलं. त्याने बीरप्पाला हादरवून सोडलं. मारेकरी बीरप्पाचा गळा आवळण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी बीरप्पाची पत्नी सुनंदा बॉयफ्रेंड सिद्धाप्पाला साथ देत होती. बीरप्पाला काहीही करुन जिवंत सोडू नकोस.बीरप्पासाठी हा धक्का होता. कारण बीरप्पाच्या घरात घुसलेला हल्लेखोर चोर, बदमाश नाही, तर सुनंदाचा बॉयफ्रेंड सिद्धाप्पा आणि त्याचा मित्र होता.
सुनंदा आणि सिद्धाप्पा परस्परापासून लांब गेलेत
सिद्धाप्पा सोबत पत्नी सुनंदा बराचवेळ फोनवर बोलायची. यावरुन बीरप्पालाने सुनंदाला बऱ्याचदा सुनावलेलं. त्यानंतर त्यांचं बोलण बंद झालं. सुनंदा आणि सिद्धाप्पा परस्परापासून लांब गेलेत, असं बीरप्पाला वाटलं. पण सिद्धाप्पाने घरात घुसून त्याला जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न हा बीरप्पासाठी मोठा धक्का होता.
मला फसवून स्वत:ला वाचवतेय
या घटनेनंतर पोलीस सिद्धाप्पाच्या मागावर होते. अटक टाळण्यासाठी त्याचे प्रयत्न चाललेले. सिद्धाप्पाने एक व्हिडिओ बनवून सर्व आळ सुनंदावर टाकण्याचा प्रयत्न केला. हा पूर्ण कट सुनंदाने रचलेला. आता ती या प्रकरणात मला फसवून स्वत:ला वाचवत आहे, असं सिद्धाप्पाने व्हिडिओमध्ये म्हटलेलं. कायदा महिलांच्या बाजूने असतो असं सिद्धाप्पाच म्हणणं होतं. त्याने व्हिडिओमधून जीवन संपवण्याचे संकेत दिलेले. पोलीस त्याला जिवंत पकडण्याआधीच गावाबाहेर जंगलात त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.











