शेतमजुराच्या पत्नीचा गळा दाबून शेजाऱ्याने केला बलात्कार….

केज : शेतमजूर म्हणून शेतात काम करीत असलेल्या एका कुटुंबातील महिलेवर शेजाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पती घराबाहेर गेलेला असताना घरात कोणी नसल्याचे पाहून नराधमाने गळा दाबून २८ वर्षीय महिलेवर अत्याचार केला.
घटना मंगळवारी (दि.९) दुपारीच्या सुमारास केज येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, केज येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एक शेतमजूर कुटुंब राहते. हे कुटुंबीय शेतातील कामे करून आपली उपजीविका भागवितात. त्यांना तीन मुली आहेत. मंगळवारी दुपारी पीडीत महिलेचा पती घराबाहेर गेला होता. त्यावेळी पीडीत महिला भांडी घासत होती. यादरम्यान त्यांच्या ओळखीचा नराधम लक्ष्मण ससाणे घरात आला व त्याने पतीची चौकशी केली.
पती बाहेर गेल्याचे सांगताच त्याने पीडीत महिलेचा हात धरला. व तिचा गळा दाबून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण ससाणे याच्यावर केज पोलिस ठाण्यात अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.











