क्राईम
कलाकेंद्रात गोळीबार, महिला जखमी; सत्ताधारी आमदाराच्या भावावर रोहित पवारांचा आरोप, काय घडल ?

Crime News : दौंड तालुक्यातील एका कला केंद्रामध्ये सोमवारी गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती आहे. दौंडमध्ये एका कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा केला असून त्यात एक तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर…
तर माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, आमदाराच्या बंधूनी त्या ठिकाणी गोळीबार केला, त्यात एका महिलेला इजा पोहोचली आहे, पोलीस जर माहिती दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर हे योग्य ठरणार नाही,
उद्या जरी या सगळ्या गोष्टी खाऱ्या निघाल्या तर पोलीस अधिकारी माहिती लपवत आहेत म्हणून कारवाई करावी लागेल. खरी माहिती लोकांसमोर आली पाहिजे, सत्तेतील लोकांचा दबाव आहे,त्या महिलेवर पण दबाव आहे, अस रोहित पवारांनी म्हटलं आहे.











