महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी, ‘दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या’ वडिलांनी घेतलं थेट आदित्य ठाकरेंचं नाव!

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरा देणारी सर्वात मोठी बातमी ही नुकतीच समोर आली आहे. दिवंगग अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर राहिलेली दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणी आता तिच्या वडिलांनी अत्यंत धक्कादायक आणि अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणारे असं प्रचंड खळबळजनक आरोप केले असून त्याविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप केला आहे की, दिशा सालियान हिचा अपघाती मृत्यू झाला नव्हता. तर तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape)करून तिची हत्या करण्यात आली. हा सगळा प्रकार लपविण्यासाठी आरोपींनी दिशाने आत्महत्या केल्याचे भासवलं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करून आदित्य ठाकरे आणि इतरांची चौकशी करावी. अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
यावेळी दिशाच्या वडिलांनी असंही म्हटलं आहे की, दिशाचा मृत्यू हा सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी जोडलेला आहे आणि या सगळ्यात आदित्य ठाकरेंची चौकशी केली जावी.
8 जून 2020 रोजी मुंबईतील मालडमधील इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. पण दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असा दावा आता दिशाच्या वडिलांनी केला आहे. आता या प्रकरणी याचिका दाखल झालेली असून त्यात थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेण्यात आल्याने या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.
‘दिशावर गँगरेप आणि हत्या.. तिच्या घरी आदित्य ठाकरेंही आलेले’, दिशाचा वडिलांनी दाखल केलेली याचिका जशीच्या तशी
दिशाच्या वडिलांनी जी याचिका दाखल केली आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की, 8 जून 2020 च्या रात्री, दिशा सालियनच्या मालाड मुंबई येथील अपार्टमेंटमध्ये एक पार्टी सुरू होती. सुरुवातीला या पार्टीत फारच कमी लोकं होते. ज्यामध्ये तिचा प्रियकर रोहन राय आणि काही जवळचे मित्र होते. पण, परिस्थिती पूर्णपणे बदलली जेव्हा खालील हाय-प्रोफाइल व्यक्ती अनपेक्षितपणे तिथे आल्या:
o श्री आदित्य ठाकरे (तत्कालीन महाराष्ट्राचे कॅबिनेट
पर्यावरण मंत्री)
o सूरज पंचोली (अभिनेता)
o दिनो मोरिया (अभिनेता)
o आदित्य ठाकरे यांचे अंगरक्षक आणि अज्ञात
व्यक्ती
दिशा सालियनवर क्रूरपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला – तिला क्रूर लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले. या दाव्याचे समर्थन खालील गोष्टींद्वारे केले जाते:
o प्रत्यक्षदर्शींचे अहवाल.
o फॉरेन्सिक विसंगती, ज्यात जून महिन्यातील शारीरिक हल्ल्याचे संकेत आहेत, जे अधिकृत पोस्टमार्टम रिपोर्टमधून जाणूनबुजून वगळण्यात आले.
o योग्य शवविच्छेदन न करता घाईघाईने अंत्यसंस्कार करणे यासह फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न.
दिशाने घडल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये यासाठी तिची हत्या करण्यात आली – सामूहिक बलात्काराच्या या घृणास्पद कृत्यानंतर, गुन्हेगारांना समजले की दिशाला जिवंत ठेवता येणार नाही. कारण ती गुन्हा आणि संबंधितांची ओळख उघड करेल. तिने या गुन्ह्याची वाच्यता करू नये यासाठी तिची हत्या करण्यात आली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि राजकारणी ताबडतोब या गुन्ह्याला लपवण्यात सहभागी झाले – दिशाच्या मृत्यूनंतर, आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अनेक फोन केले आणि त्यांना खालील गोष्टी करण्यास सांगितल्या:
o पुरावे दडपून टाका आणि मीडियाचं नरेटिव्ह नियंत्रित करा.
o प्रत्यक्षदर्शी आणि घटनेची माहिती असलेल्यांना धमकी द्या.
o पुढील तपास टाळण्यासाठी प्रकरण तात्काळ बंद करा.
सुरुवातीला मालवणी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस अधिकारी यासह रोहन राय आणि तत्कालीन मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली. मी या लोकांनी सांगितलेल्या कहाणी आणि त्यांच्या दबावाला बळी पडलो. त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की, की तिला काही दुर्घटनेमुळे तिचा जीव गमवावा लागला असेल.
दिशा आणि सुशांतच्या मृत्यूमध्ये होते 5 दिवसांचे अंतर
28 वर्षीय दिशा सालियान ही सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर होती. 9 जून 2020 रोजी पहाटे 2 वाजता इमारतीवरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला. पाच दिवसांनंतर, म्हणजे 14 जून 2020 रोजी, सुशांत सिंह राजपूत त्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यावेळी दोघांच्याही मृत्यूबाबत वेगवेगळ्या चर्चा समोर येत होत्या.
दरम्यान, आता खुद्द दिशाच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल करून मुलीवर गँगरेप करून हत्या झाल्याचे आरोप करत थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. ज्याचे पडसाद हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात उमटतील.