औरंगजेबाच्या कबरीवर तुळशीचं रोप का लावलं जातं? कारण काय ?

छावा चित्रपटामुळे इतिहासाला उजाळा मिळाला असून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा शत्रू मुघल बादशहा औरंगजेब.
दिल्लीचा बादशाह असलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या संभाजीनगरमध्ये आहे. औरंगजेबच्या कबरीवरुन महाराष्ट्रात सध्या मोठ्या वाद सुरु आहे. औरंगजेबची कबर पाडण्याची मागणी केली जात आहे. औरंगजेबच्या कबरीचे बांधकाम अतिशय साधे आहे. मात्र, औरंगजेबच्या कबरीवर कायम तुळीचे रोप लावले जाते. जाणून घेऊया औरंगजेबाच्या कबरीवर तुळशीचं रोप का लावलं जातं?
औरंगजेबाची उभी हयात मराठ्यांविरोधात लढण्यात गेली. स्वराज्याच्या अस्तित्वासाठी मराठ्यांनी एकजुटीनं औरंगजेबाला झुंजवलं. इतकच नाही तर त्याची कबरही याच मातीत गाडली. मी सव्वाशे वर्ष जगेन असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यू वयाच्या 89 व्या वर्षीत नैसर्गिकरीत्या झाला. 3 मार्च, 1707 साली नगरच्या भिंगार किल्ल्यात औरंगजेबाचा मृत्यू झाला. आपल्याला खुलताबादला दफन करावं अशी औरंगजेबाची इच्छा होती. अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला.
अखेरच्या घटका मोजत असताना औरंगजेबाने त्याचं मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. खुलताबादला दफन करावं असे औरंगजेबने मृत्यू पत्रात नमूद केले होते. त्यात त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील लिहीले होते. औरंगजेबानं आपली कबर फक्त 14 रुपये 12 आणे एवढ्याच खर्चात बनवायची असं मृत्यूपत्रात लिहीले होते. औरंगजेबानं आपल्या अखेरच्या टोप्या विणून त्यातून आलेल्या पैशांमधून कबरीची जागा विकत घेतल्याची अख्यायिका आहे. मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्याच इच्छेनुसार त्याचा मुलगा आझम शाह यानं सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधली. शेख झैनुद्दीन हे औरंगजेबचे गुरु होते.
लाल दगडांनी बांधलेली ही कबर अत्यंत साधी आहे. पण, औरंगजेबाच्या कबरीवर तुळशीचं रोप लावलं जाते. याचे कारण देखील औरंगजेबच्या मृत्यूपत्रात आहे. कबरीवर कोणतेही छत नसावे. कबर नेहमी तुळशीच्या छायेत असावी असं औरंजेबने मृत्यूपत्रात लिहीले होते. यामुळे औरंजेबच्या इच्छेनुसार कायम त्याच्या कबरीवर तुळशीचे रोप लावले जाते.