नागपूरमहाराष्ट्र

महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला? देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल …


महाराष्ट्रात औरंग्याची कबर हवीच कशाला असा संतप्त सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर ESIनं कबरीचं संरक्षण करायला सांगणे हे दुर्दैवं आहे अशी खंतही फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

मात्र कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. जर कुणी उद्दात्तीकरण केलं तर त्याचा तिथेच चिरडून टाकू असा इशाराही दिला आहे.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ⁠आज आपण अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतो. हनुमानाचे दर्शन घेतल्याशिवाय रामाचे दर्शन पूर्ण होत नाही. तसं शिवरायांचे दर्शन घेतल्याशिवाय कोणत्याही देवाचे दर्शन होत नाही. जिजाऊंनी त्या काळात देव, देश, धर्मासाठी रयतेचे राज्य झाले पाहीजे म्हणून शिवरायांना घडवले . श्री राम युगपुरुष होते. ⁠शिवरायांना 18 पघड जातींना एकत्र केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष निर्माण केलं . महाराजांनी या मातीत एक अंगार फुलवला . औरंगजेबला याच मातीत गाडला आहे.

जातीत विभागला गेलेला महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षीत नाही : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र एकसंघ, एकोपाने राहाणार महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित आहे. जातीत विभागला गेलेला महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षीत नाही. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संगमेश्वरचा वाडा सुद्धा विकासासाठी घेत आहेत. दिल्लीत ज्या किल्ल्यांत महाराजांना ठेवले होते ते विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडे मागणी केली आहे. या मंदिराच्या स्थळाला तीर्थस्थळाचा दर्जा तात्काळ दिला जाईल . पीडब्युला तात्काळ सांगतो की इथे चांगले रस्ते करावेत.
जी शिवभक्तांची भावना, तीच माझी भावना: एकनाथ शिंदे

औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही जशी शिवभक्तांची भावना आहे तीच माझीही भावना आहे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्यक्त केलीय. त्यामुळे क्रूरकर्मा औरंग्याचं कुणीही समर्थन करू नका असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावलाय. औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वादाच्या अनुषंगाने शिंदेंनी भाष्य केलंय . तसेच शिवभक्तांच्या भावनांचा आदर मी करतो,

 

औरंगजेबाने संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महाराज यांचे शौर्य आणि औरंगजेबाचे क्रौर्य, त्या क्रौर्याची परिसीमा त्याने गाठली होती. दरम्यान, जो खरा देशभक्त आहे, त्याने औरंगजेबाचे उदात्तीकरण करू नये. क्रूरकर्मा औरंग्याचे कोणीही समर्थन करता कामा नये असं म्हणन त्यांनी विरोधकांनाही टोला लगावलाय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button