
बीड : बीड शहरात 15 ते 20 दिवसाला पाणी येते. मात्र, हद्दवाढ भागात तर पाणीच येत नाही. आले तर कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, यामुळे बीड शहरातील नागरीक त्रस्त झाले आहेत ,स्वराज्य नगर, सोमेश्वर मंदिर परिसर, संत नामदेव नगर, अंकुश नगर, बार्शी रोड, पिंपरगव्हान रोड यासह बीड शहरातील इतर भागात तिव्र पाणी टंचाई जानवत आहे .
बोंब मारो आंदोलन
आंदोलनाचे नियोजन श्री वर्षा जगदाळे यांनी केले होते तर आंदोलनास प्रमुख उपस्तीथी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री सदाशिव बिडवे शहराध्यक्ष अमर जान पठाण उपशहराध्यक्ष आकाश टाकळकर, विजय शिंदे, स्वराज्य मस्के पाटील इब्राहिम चाऊस, इतर सर्व महाराष्ट्र सैनिक व महिला सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या
आज बीड नगरपरिषद समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बीड शहराला होत असलेल्या वीस दिवसाला पाणीपुरवठा केला जातो. याचा तीव्र निषेध केला व बीड शहराला पिण्याचे पाणी तीन दिवस आड सोडावे ही मागणी नगरपालिका प्रशासनाकडे केली
बीड भ्रष्ट नगरपालिका प्रशासनाचा बोंब मारो आंदोलन करून तीव्र निषेध केला, व भ्रष्ट मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या
नावाने गाडगे मडके फोडून आंदोलन करण्यात आले येणाऱ्या 15 ते 20 दिवसात सुरळीत पाणी पुरवठा व शहरातील कचरा नियोजन,
व्हिडिओ येथे पहा !
तुंबलेल्या नाल्या,बंद पडलेले पथदिवे, मोकाट जनावरे याबाबद सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास नगरपालिका कार्यालयात मोकाट जनावरे सोडणार व दूषित पाणी मुख्याधिकारी मॅडमला पाजणार ! असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे
..