Social Viral News

लेकीच्या सौंदर्यामुळे पतीचा संशय ठरला खरा, DNA टेस्ट केली अन् उघड झालं गुपित


आपण विचार करतो तसं आयुष्यात होतंच असं नाही. काही घटना आपल्या आयुष्याची दिशा बदलतात. नवरा बायको आणि ती सुंदर मुलगी असं त्यांचं आनंदी कुटुंब होतं. पण मुलीचा जन्म झाला पण बापाचा आनंद गगनात मावत नव्हता.

पण मुलीचं सौंदर्य पाहून तो जरा गडबडलाच. वेळ जात होतो, मुलगी मोठी होत होती, दिवसेंदिवस तिचं सौंदर्य वडिलांच्या मनात बायकोबद्दल संशय निर्माण करत होता. ते झालं असं की, मुलीचं सौंदर्य पाहून नवऱ्याला बायकोवर संशय आला होता. संशय असा होता की, त्याला सत्य जाणून घेण्यास भाग पाडलं. त्यासाठी त्याने डीएनए टेस्ट केली अन् मुलीचं गुपित उघड झालं.

 

ती मुलगी नेमकी कोणाची?

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वडिलांना मुलीच्या सौंदर्याकडे पाहून कायम शंका यायची ही मुलगी खरंच आपलीच आहे ना. मुलगी मोठी होत होती आणि तिचं सौंदर्य वडिलांच्या मनात संशयाच घर करत होतं. त्याचा संशय एवढा वाढला की, त्यांना अखेर सत्य जाणून घेण्यासाठी पत्नीला डीएनए टेस्टची मागणी केली. नवऱ्याचा हे संशय आणि वेडेपणा पाहून तिचा राग अनावर झाला. तिने टेस्ट करण्यास नकार दिला.

 

पण त्याचा संशय दिवसेंदिवस वाढत होता. तो मद्यपान करु लागला अखेर त्यांनी डीएनए टेस्ट केली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात भूकंप आला. ती मुलगी खरंच त्याची नव्हती. त्याला बायकोच्या चरित्रावर संशय आला. तिने सगळ्या प्रकारे त्याला समजून सांगितलं की, तिने असं काहीही केलं नाही. तिच्या दुसऱ्या कोणाशी कधीही शारीरिक संबंध आला नाही. पण तो ऐकायला तयार नव्हता.

 

मग एकेदिवशी ती मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली. दुसऱ्या शहरात गेली आणि तिथे मुलीसोबत राहू लागली. मुलीला शाळेत घातलं आणि त्यांचं आयुष्य सुरु होतं. मात्र काही दिवसांनी पती पत्नीमध्ये समेट झाला आणि ते घरी परतले. एके दिवशी शाळा बदलत असताना त्या मुलीची नवीन शाळेतल्या एका मुलाशी मैत्री झाली. योगा बघा ज्या मुलाशी तिची मैत्री झाली त्या दोघांचा जन्मही एकाच दिवशी आणि एकाच रुग्णालयातील होता. तिने नवीन मित्राला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीला बोलावलं. त्या नवीन मित्राचा चेहरा वाढदिवसाच्या मुलीच्या वडिलांशी अगदी जुळत होता. त्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत चर्चा केली.

 

त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी चाचणी करण्याचा विचार केला, त्यानंतर डीएनए चाचणी केली असता ती मुलगी त्या कुटुंबाची आणि त्या कुटुंबातील मुलगा या लोकांचा असल्याच समोर आला. रुग्णालयाचा हलगर्जीपणामुळे मुलांची बदला बदल झाली होती. दरम्यान या घटनेनंतर, दोन्ही कुटुंबांमधील संबंध वाढले कारण त्यांना त्यांच्या मुलींनी मोठे झाल्यानंतर कुठे राहायचे हे ठरवायचे आहे. मात्र, दोन्ही कुटुंबांनी कायदेशीर कारवाई केली की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना व्हिएतनाममधील आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button