धार्मिक

आईशप्पथ सांगतो…तर माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही !


देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्राप्रमाणेच आग्र्यातही पारंपारिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

उत्तर प्रदेश सरकारने छत्रपती शिवाजी महाराज बंदी असलेली जागा आम्हाला द्यावी, त्या ठिकाणी असं भव्य स्मारक उभारू अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. या स्मारकाला ताजमहलपेक्षाही जास्त लोक त्याला भेट देतील, तर माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही असेही ते म्हणाले.

 

आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांना बंदी बनवण्यात आले होते, ती कोठी आज मीना बाजार या नावाने ओळखली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “योगीजींना विनंती करून ही जागा महाराष्ट्र शासन अधिग्रहीत करेल. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाईल. हे स्मारक इतकं सुंदर असेल की ताजमहलपेक्षा जास्त लोक या ठिकाणी भेट देतील. असं झालं नाही तर मी देवेंद्र फडणवीस हे नाव लावणार नाही.”

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवाजी महाराज स्वाभिमानाने आग्र्यात राहिले. तिथून स्वराज्यात गेले आणि हारलेले 24 किल्ले त्यांनी जिंकले. पण औरंगजेब काहीच करु शकला नाही. शिवाजी महाराज केवळ राजा नव्हते, तर ते एक युगपुरुष होते.

 

औरंगजेब आमचा पूर्वज नाही

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगाबादचे नामकरण आम्ही छत्रपती संभाजीनगर केलेले आहे., आमचे हिरो छत्रपती संभाजी महाराज आहेत. औरंगजेब हा जिंकण्यासाठी महाराष्ट्रात आला पण जिवंत परत गेला नाही. मात्र त्याची कबर ही महाराष्ट्रातच झाली, औरंगजेब आमचा पूर्वज नाही.किंवा तो आमचा सुपर हिरो नाही.

 

विकी कौशलची कार्यक्रमाला उपस्थिती

यावेळी कार्यक्रमाला अभिनेता विकी कौशल देखील उपस्थित होता. महाराष्ट्राचा लाडका देवाभाऊ असे म्हणतात असं म्हणत विकी कौशलने देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. शिवाजी महाराजांचे शौर्य, त्यांचे धाडस आणि विचारधारा ही येणाऱ्या पिढ्यांच्या हृदयात अखंडपणे राहण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहनही विकी कौशलने केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button